इन्फंट जिजस प्रकरण अत्यंत गंभीर : तपास योग्य दिशेने सुरु
राजुरा येथे घडलेले इन्फंट जिजसचे प्रकरण जाणून घेण्यासाठी नागपूर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना बुधवारी स्वतः चंद्रपूर येथे आले.सुमारे तिन तास या प्रकरणात बैठक चालली व तपास सुरु होता. यानंतर या अधिकाऱ्यांनी इन्फंट जिजस स्कुलच्या परिसरातील वसतीगृहाला भेट दिली.
हे प्रकरण अतिशय गंभीर असुन त्याचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
हे प्रकरण अतिशय गंभीर असुन त्याचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
दरम्यान तपास अधिका-यांनी राजुरा येथील खाजगी व्यवसाय करणाऱ्या तिन डाँक्टर व एका औषध विक्रेत्याची पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. या डाँक्टरांनी मुलींवर उपचार केले होते. तसेच औषध विक्रेत्याने गुंगीचे औषध दिले होते. या डाँक्टरांनी अत्याचार झाल्याची माहिती होती. परंतू त्यांनी ती दडवून आरोपींना मदत केली. असा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे.