Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १०, २०१९

मतदानाच्या दिवशीचे बिएलओंना मानधन मंजूर

🔵प्रथमच बिएलओंना निवडणूकीचे मानधन

🔵विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ व वसंतराव नाईक कर्मचारी संघटनेची निवडणूक अधिकार्‍यांकडे मागणी

नागपूर /-प्रतिनिधी 

- लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहून राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या बिएलओंना त्या दिवशीचे मानधन 250 रुपये देण्यात येणार आहे. निवडणूकीच्या मानधनाची मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ व वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे निवडणूक अधिकार्‍यांना 16 मार्च रोजी दिलेल्या निवेदनात केली होती .*

वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमचंद राठोड व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे विभागिय संघटन सचिव खिमेश बढिये यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पारशिवनी तहसीलदार वरुण सहारे यांंची भेट घेऊन बिएलओंना मतदानाच्या दिवशी मानधन मिळण्यासंदर्भात चर्चा केली. यात निवडणूक अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पडण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) प्रयत्नरत असतात. 11 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी बिएलओ पूर्ण वेळ मतदान केंद्रावर मतदार यादीसह उपस्थित राहून मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. मात्र निवडणूक विभागातर्फे केवळ मतदान अधिकार्‍यांनाच त्या दिवशीचे मानधन देण्यात येते. तर बिएलओंना कुठलेही मानधन देण्यात येत नाही. त्यामुळे बिएलओंमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या सर्वांना निवडणूक मानधन देण्यात येत असताना बिएलओंना सुध्दा मानधन देण्यात यावे, यासंदर्भातील निवेदन 17 व्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाकडे तहसीलदार पारशिवनी यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनावर निर्णय घेत बिएलओंना मतदानाच्या दिवशीचे 250 रुपये मानधन देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार वरुण सहारे यांनी सांगितले. हि रक्कम बिएलओंना मतदानाच्या दिवशीच पोलींग आॅफीसर कडून मिळणार आहे. उपरोक्त मागणी वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमचंद राठोड, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे विभागिय संघटन सचिव खिमेश बढिये, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका संघटक भीमराव शिंदेमेश्राम, जिल्हा ग्रामीण संघटक गणेश खोब्रागडे, प्रशांत वैद्य, विशाल बमनोटे, किशोर जिभकाटे, भाविका गेहानी, मनोज डोंगरे, शैलेश सोलंकी, टि. आर. चापरे, सुनिता देशमुख, नलिनी दांडेकर, कविता मसराम, जी. डी. राठोड श्री कुरसुंगे, अनिल नागपुरे, यांच्यासह बिएलओंनी केली होती. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.