Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १०, २०१९

जवानाचे शर्थीचे प्रयत्न आणि श्वान व तिच्या पिल्लांना जीवदान

दत्ताञय फडतरे (पुणे

काल(मंगळवार) दुपारी बारा वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे गुरुवार पेठ येथील नाईक वाड्यात असलेल्या 40 फूट खोल विहीरीमध्ये एक स्त्री जातीचे श्वान खोल विहीरीत पडले असून त्याची 5 पिल्ले ही जवळपास असल्याची वर्दि नागरिकांनी दिली. तातडीने क्षणातच अग्निशमन मुख्यालयातून बचाव पथक रवाना झाले.


तिथे घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांनी विहीरीमध्ये सुमारे 35 फूट खोल पाण्यामध्ये श्वानाच्या ओरडण्याचा आवाज एेकला पण सुदैवाने ती 5 पिल्ले पाण्याबाहेर असल्याचे त्यांनी पाहिले. लगेचच जवान प्रकाश शेलार यांनी एका मुक्या प्राण्याचा जीव व सोबतच त्या पिल्लांची दशा पाहून दोरीच्या साह्याने खाली विहीरीमधे उतरण्याचे ठरवून ते चक्क त्या विहीरीमध्ये उतरले. जवान शेलार यांनी त्या पाण्यातील श्वानाच्या जवळ जात भेदरलेल्या श्वानाला रशीच्या मदतीने योग्यप्रकारे बांधून इतर जवानांना वर ओढण्यास सांगितले व स्वत: शेलार विहीरीतून बाहेर आले. या सुटकेकरिता तीस मिनिटाचा अवधी लागला.

श्वान बाहेर येताच त्या पिल्लांनी त्यांच्या मातेकडे धाव घेत तिला बिलगले. हे सर्व मायेचे चित्र पाहून व जवान प्रकाश शेलार यांनी बजावलेले तत्परतेचे जमलेल्या नागरिकांनी कौतुक करत  आभार मानले.

या कामगिरीमधे अग्निशमन मुख्यालयातील वाहनचालक नवनाथ मांढरे तसेच जवान प्रकाश कांबळे, शफिक सय्यद, राजेश घडशी यांनी ही सहकार्य केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.