Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १०, २०१९

लोकसभा प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

वरोरा(चंद्रपुर)/प्रतिनिधी: 
hard attack death india साठी इमेज परिणाम
संग्रहित 
पंचायत समिती वरोरा अंतर्गत येणाऱ्या टेम्भूर्डा आबमक्ता क्षेत्राचे पंस सदस्य तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ता नारायण पाटील कारेकर (वय 77) हे 8 एप्रिलला भाजप-शिवसेना युतीचे लोकसभा उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचार मोहिमेत सहभागी झाले होते.कडक ऊन अश्यातच प्रचारादरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

नारायण पाटील पाटील कारेकर हे वरोरा तालुक्यातील येरखेडा येथील रहिवाशी असून, मागील २० वर्षांपासून भाजप पक्षात सक्रिय होते. ते टेमुर्डा आबमवता क्षेत्राचे वरोरा पंचायत समितीचे विद्यमान सदस्य होते. लोकसभेच्या रणधुमाळी सुरू असताना, भाजप शिवसेना पक्षाचे उमेदवार हंसराज अहिर यांचे प्रचारार्थ वरोरा तालुक्यातील शेगाव, वायगाव, चारगाव भागात प्रचार मोहिमेत सहभागी झाले होते. परंतु बेंबाळ वायगाववरून प्रचार रॅलीत सहभागी होण्यासाठी चारगाव बुर्ज येथे पोहोचले. कार्यकर्त्यांशी चर्चा करीत असताना त्यांनी बाथरूमला जातो असे सांगून बाथरूमला गेले.बाथरूम मधून आल्यानंतर खुर्चीवर बसळे अचानक त्यांना

अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी शेगाव येथे आणत असताना चारगाव -शेगाव मार्गात त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.