चंद्रपूर/प्रतिनिधी:
११.०४.२०९९ रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्याचे मतदान होत असुन या मतदान प्रकियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता प्रशासन सज्ज दााळेळे आहे. निवडणुक बंदोबस्त हा अति महत्वाच्या बंदोबस्तापैकी असुन याकरीता मोठया संख्येने मनुष्यबळ तैनात करण्यात येते.
चंद्रपुर जिल्हयात एकुण २९३१९ मतदान केंद्राद्वारे मतदान प्रकिया राबविण्यात येणार असुन त्यापैकी ९२ मतदान केंद्र हे महिलांकरीता तयार करण्यात आलेले आहे. या मतदान प्रकियेमध्ये पोलीस विभागातील एकुण ४९४२ अधिकारी आणि कर्मचारी हे बंदोबस्ता करीता तैनात करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये १५० पोलीस अधिकारी व ३४०९ पोलीस कर्मचारी, ०९ सीआयएसएफ कंपनी, ०३ एसआरपीएफ कंपनी, ७८९ होमगार्ड, सी-६० व दंगानियंत्रणचे प्रत्येकी ०२ पथक, व ०१ बॉम्ब शोधक पथक यांच्यासह पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज, नागपुर, मुंबई येथुन एकुण ६९५९ नवप्रविष्ट पोलीस कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. या सोबतच बाहय सुरक्षेमध्ये एसएसटी पाईन्ट मध्ये ७१, एफएसटी मध्ये ६४, व्हीएसटी मध्ये २०, वाहतुक नियंत्रण शाखेतील ९५, व पोलीस मोटार
परिवहन विभाग येथील १६९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा चंद्रपुर जिल्हयात निर्भयपणे व शांतेत पार पाडावा या करीता प्रशासन सज्ज असुन सामान्य नागरीकांनी सुध्दा सदर बंदोबस्तात पोलीस विभागाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.