Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १५, २०१९

वाहतूक पोलिसाचा प्रामाणिकपणा;हरविलेला पैस्याचा पाकीट केला परत

चंद्रपूर(ललित लांजेवार:९१७५९३७९२५):

वाहतूक पोलीस हा कायमचाच साऱ्यांच्या टिकेचा धनी. त्याने शिस्त दाखवली तरी त्याच्यावर टीका आणि त्याने कोणावर कारवाई न करता सोडून दिले तरी त्याने चिरीमिरी घेतल्याची टीका. पण वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा त्यांच्या कार्यातून दिसुन येतो.असाच एक प्रमानिकतेचा परिचय चंद्रपुरात पुन्हा वाहतूक पोलिसांनी समाजापुढे आणला आहे.

१४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,त्यानिमित्य शहरात मोठ्या संखेने मिरवणुकीची गर्दी जमली होती अश्यातच चंद्रपूर जिल्हा उत्पादन शुल्क विभागात कार्यरत कर्मचारी श्री.भगत याचा ५००० रू. असलेले पैस्याचे पाकीट छोटा बाजार परिसरात रस्त्यावर गडबडीत पडला,अन ते चंद्रपूर वाहतूक पोलिसातील कर्मचारी उमेश कोडापे आणि विजय झोळे यांच्या हाती लागला.त्यांनी प्रामाणिकपणे ते पाकीट उचलून आपल्या जवळ ठेवले.तितक्यात भगत हे पाकीट शोधतच होते तितक्यात पोलिसांना पाकिटात असेलेल्या एका नंबरवर संपर्क साधत भगत यांचा नंबर मिळविला व भगत यांचेशी संपर्क होताच पोलिसांनी त्यांना विचारपूस केली.व संपूर्ण शहनिशा करून ते पाकीट ज्यांचे होते असे भगत यांना सुपूर्त करण्यात आले,त्यात ५००० रुपये रोख व ४ ATM यासह अन्य महत्वाचे कागदपत्र होते. 

याआधी देखील चंद्रपूर पोलिसांनी शहरात विविध प्रशंसनीय कामे केली आहेत,ज्यात वृद्धाना व लहान शालेय मुलांना रस्ता ओलांडण्यात मदत करणे,गरजूंना रक्तदान करणे,हरविलेले मोबाईल परत करणे यश अन्य प्रशंसनीय कामे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

मागील काही दिवसा अगोदरच अमरदीप दिलीप निमसकार वय १८ वर्षे या महाविध्यालयीन विद्यार्थ्याचा ७ हजार किमतीचा मोबाईल जटपुरा गेट परिसरात हरविला. हा हरवलेला मोबाईलचा शोध हा विध्यार्थी घेत होता. तितक्‍यातच त्या ठिकाणी चंद्रपूर वाहतूक पोलिसातील सहाय्यक वाहतूक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र तुमसरे यांना हा मोबाईल मिळाला तुमसरे हे जटपुरा गेट कर्तव्य बजावत होते. त्यांना हा हरविला मोबाईल मिळाला त्यांनी हा मोबाईल आपल्या जवळ ठेऊन घेतला. मोबाईल शोधात असलेल्या मुलाला त्याचा मोबाईल परत केला. 

रविवारी पैस्याचे पाकी परत करून चंद्रपूर पोलिसाने आणखी एकदा वाहतूक पोलिसाच्या नदारीचा परिचय सर्वांपुढे आला.पोलिसाच्या या प्रमानिकतेच्या परिचयामुळे पुन्हा एकदा वाहतूक विभागाची मान उंचावली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.