Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १५, २०१९

आता दुपारी 11 नंतर नो शटडाऊन;महावितरणचा हिट ॲक्शन प्लान

नागपूर/प्रतिनिधी:

 शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुंस्तीचे काम तुर्तास उर्वरीत ऊन्हाळ्याभर सकाळी 11 च्या पुर्वी केले जाणार आहे

मान्सुमपूर्व तयारीच्या कामात महावितरणने गती पकडली आहे. ही कामे लवकरात लवकर पुर्ण करावयाची याशिवाय नियमित देखभाल व दुरुंस्ती सोबतच महामेट्रोच्या अत्यावश्यक कामांसाठी वेगवेगळ्या भागातील वीजपुरवठा रितसर पुर्वसुचना देऊन काही वेळेपुरता स्थगित केल्या जात आहे.

 अनेकदा दुपारभर ही कामे चालत असल्याने संबंधित भागाचा वीजपुरवठा काही तासांसाठी बंद केल्या जातो, मात्र मागिल काही दिवसांपासून नागपुरात अंग पोळूंन काढणारे तापमान बघता देखभाल व दुरुंस्तीचे कामासाठी सकाळी 11 वाजताच्या पुढे वीजपुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागाने घेतला आहे. यामुळे देखभाल व दुरुंस्तीच्या सर्व कामांकरिता नागपुरातील महावितरणच्या ग्राहकांना पुर्वसुचना देऊन सकाळी 11 पुर्वीच वीजपुरवठा बंद केला जाणार आहे. 

मागिल काही दिवसांपासून नागपूरकरांना प्रचंड ऊन्हाळ्याला सामोरे जावे लागत आहे. पा-याने सातत्त्याने चाळीशी ओलांडली आहे. अश्यावेळी देखभाल व दुरुंस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद केल्याने ग्राहकांना प्रचंड मनःस्ताप होतो, सोबतच देखभाल व दुरुस्तीच्या कामावरील कर्मचा-यांनाही कडक उनाचा त्रास होतो, हे लक्षात घेता किमान ऊन्हाळ्यात तरी वीज ग्राहकांना यात दिलासा मिळांवा याकरिता महावितरणच्या शहर मंडलाचे अधिक्षक अभियंता दिलीप दोडके आणि काँग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी यापुर्वीच सुरु करण्यात आली असून. प्रचंड उष्णता व वीजेचा वाढीव भार यामुळें वीज वितरण यंत्रणेत एखादा तांत्रिक दोष निर्माण झाल्यास दुपारीही वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. हा बिघाड त्वरीत दुरुंस्त करुंन वीजपुरवठा सुरळीत करेपर्यत ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे तसेच खंडित वीजपुरवठा किंवा वीजेसंबंधी तक्रारीसाठी 1912 किंवा 18002 333435 अथवा 18001 023435 या टोल फ़्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

महावितरणची एसएमएस सेवा:-
मीटर रिडींग, वीज देयक, वीजपुरवठा खंडित, बीलभरण्याची मुदत आदीबाबत माहिती देण्यासाठी इंग्रजीसोबतच मराठी भाषेतील एसएमएस देण्याची सुविधा महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली असल्याने महावितरण ग्राहकाला इंग़्रजी किंवा मराठी एसएमएसचा पर्याय निवडता येत असून मराठी एसएमएस साठी ग्राहकाने MLANG <ग्राहक क्रमांक> 1 तर इंग्रजी एसएमएस साठी ग्राहकाने  MLANG <ग्राहक क्रमांक> 2 टाईप करून 9225592255 या क्रमांकावर पाठवायचा आहे, त्यांनी निवडलेल्या पर्यायानुसार ग्राहकाला मराठी किंवा इंग्रजी एसएमएस सेवा उपलब्ध होत असल्याने, ग्राहकांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.