Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल २३, २०१९

नागनदी प्रदूषण निर्मूलनासंदर्भात ’जिका’ मिशन नागपुरात


प्रतिनिधींची मनपा आयुक्तांशी चर्चा : निप्पॉन कोई इंजिनिअरींग कन्स्लटंटच्या कार्याचा घेतला आढावा

नागपूर, ता. २३ : ‘नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पा’च्या विकास आराखड्यासाठी राष्ट्रीय नदी संरक्षण निदेशालय (NRCD)कडून १२५२.३३ कोटीची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसहाय्य करणार आहे. याबाबत २८ नोव्‍हेंबर २०१८ला‘जिका’ (जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) आणि मनपामध्ये करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रकल्पासंदर्भात मंगळवारी (ता.२३) ‘जिका’ मुख्यालयातील दक्षिण आशिया विभाग 1 (भारत/भूतान)चे उपसहाय्यक संचालक झावझा अंग (ZAWZAE Aung) व दक्षिण आशिया विभाग 1 (भारत/भूतान)चे कोयामा हरूका (KOYAMA Haruka) यांनी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी चर्चा केली.

‘नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प’ नियोजन कार्याच्या अंमलबजावणी संदर्भात ‘जिका’कडून निप्पॉन कोई इंजिनिअरींग कन्स्लटंटची नियुक्ती करण्यात आली असून या चमूकडून ९ जानेवारीपासून मनपामध्ये कार्य सुरू आहे. या कार्याचाही यावेळी प्रतिनिधींनी आढावा घेतला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त व ‘नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पा’चे अध्यक्ष राम जोशी, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल, ‘जिका’ने नियुक्त केलेल्या निप्पॉन कोई इंजिनिअरींग कन्स्लटंटचे ताकामासा निशिकावा (Takamasa NISHIKAWA), एनजेएसचे प्रकल्प सल्लगार विद्याधर सोनटक्के, नागनदी प्रकल्प अंमलबजावणी चमूच्या सदस्य डॉ. प्रणीता उमरेडकर, मो. शफीक, संदीप लोखंडे, श्री. जीवतोडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, आर.डी. राउत, श्री. संगीडवार उपस्थित होते.

***

JICA mission in Nagpur for Nag River Abatement Project

JICA mission reviewed the work of Nippon Koi Engineering Consultancy
Nagpur, April 23: A meeting was held at NMC headquarters where officials of Japan International Cooperation Agency (JICA) and NMC Commissioner Abhijeet Bangar reviewed the status of work in progress by JICA prepatory team for appraisal of the ‘Nag River Abatement Project’. National River Conservation Directorate has approved to grant1252.33 Crore for the implementation of Abatement project. JICA is the funding agency for the project and a memorandum of understanding was signed on November 28, 2018.

Deputy Assistant Director of South Asia Division 1 (India/Bhutan) Zawzaw Aung and Koyama Haruka of JICA were also present for the meeting.



For the successful implementation of the Nag River Pollution Abatement Project, JICA had appointed Nippon Koi Engineering Consultancy. Since January 9, 2019, Nippon Koi's officials have started working on the project from NMC headquarters. The officials reviewed their work at the meeting.





Ram Joshi Additional Commissioner and Chairman of ‘Nag River Abatement Project’, Moh. Israil Technical Advisor (river and lakes), Takamasa Nishikawa of Nippon Koi Engineering Consultancy, Vidyadhar Sontakke Project Consultant of NJS, Team Members of Project Implementation Unit Dr. Pranita Umredkar, Moh. Shafik, Sandeep Lokhande, Jivtode, Garden Superintendent Amol Caurpagar, R.D. Raut and Sansinwar were also present at the meeting.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.