एफसीएने बंगळुरू, गोवा, अजमेर आणि पटियालामध्ये शोरूमचे अस्तित्व वाढवले आहे
- एफसीएचे रिटेल अस्तित्व आता ७० भारतीय गावे आणि शहरांमध्ये वाढले आहे
- बंगळुरूमध्ये आता ४ एफसीए शोरूम्स असून त्यात अलीकडेच भर पडलेल्या शोरूमचाही समावेश आहे
- गोव्यात आता नवीन एफसीए शोरूम आणि कार्यशाळा आहे
- वारंगळमध्ये नवीन जीप कनेक्ट शोरूम उघडण्यात आले आहे
- एफसीएने मोपार कार्यशाळांची संख्या ८४ पर्यंत नेली आहे
मुंबई : एफसीए इंडिया या पुरस्कारविजेत्या जीप कंपास उत्पादक कंपनीने आज आपल्या रिटेल नेटवर्कचा विस्तार ७० भारतीय शहरे आणि भागांमध्ये ८२ विविध विक्रीच्या ठिकाणी झाल्याची घोषणा केली आहे. यात एफसीएच्या जीप, फियाट आणि अबार्थ वाहनांची विक्री करणाऱ्या मोठ्या भारतीय शहरांमधील शोरूम्सचा आणि जीप कनेक्ट शोरूम्स तसेच सॅटेलाइट शहरे आणि निमशहरी भागांचा समावेश असलेल्या शोरूम्सचा समावेश आहे.
आपल्या रिटेल नेटवर्क विस्ताराची घोषणा करताना केविन फ्लिन - अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एफसीए इंडिया म्हणाले की, “आमचे ध्येय एक वाढते रिटेल आणि आफ्टर सेल्स नेटवर्क आणण्याचे होते, जे धोरणात्मकदृष्टया आमच्या बाजारातील वाढत्या आकारमानाला पूरक ठरेल. ७० शहरे आणि निमशहरांमधील ८२ रिटेल आऊटलेट्ससह आम्ही मोठ्या प्रमाणावरील भूभाग आणि ग्राहकांना सेवा देत आहोत. जीप कंपासचे ऑगस्ट २०१७ मध्ये अनावरण झाल्यापासून आम्ही आमचे रिटेल नेटवर्क ५० टक्क्यांहून अधिक वाढवले आहे. आमचे प्रयत्न आमच्या नेटवर्क विस्तारात सातत्य ठेवणे आणि सुधारित सेवा व्याप्तीसह ग्राहक अनुभवात सर्वोत्तमता आणणे हे आहे.''
या विस्तारासोबत, एफसीएची बंगळुरूमध्ये चार सर्व ब्रँड्सची शोरूम आली आहेत. एमपीएस मोटर्स प्रा. लि.ने दोन शोरूम्सचे उद्घाटन केले असून त्यातील एक जीआर ग्रँड प्लाझा, जेपी नगर, फेज ६, कनकपुरा मेन रोड, बंगळुरू येथे असून दुसरे इलेक्ट्रॉनिक सिटीजवळ, लवकुश नगर, होसूर रोड येथे आहे. केएचटी एजन्सीज प्रा. लि.ची इतर दोन (२) विद्यमान शोरूम्स कोरमंगला आणि यशवंतपूर येथे आहेत. एफसीएची कर्नाटकात सात (७) ऑल-ब्रँड शोरूम्स असून हुबळी, म्हैसूर आणि बेळगाव येथेही त्यांचे अस्तित्व आहे.
नवीन एफसीए ऑल-ब्रँड शोरूम- एमव्हीआर ऑटो आता करनझेलन, पणजी गोवा येथे आहे.
दोन नवीन जीप कनेक्ट शोरूम्सही उघडली आहेत, एक- निधी कमल कंपनी परबतपुरा बायपासजवळ, अजमेर, राजस्थान येथे आणि दुसरे- डब्ल्यूएसएल ऑटोमोबाइल्स प्रा. लि., बहादूरगड, राजपायरा रोड, पटियाला, पंजाब येथे आहे.
जीप कनेक्ट हे एक नेटवर्क विस्तार धोरण असून त्यातून जीप® आणि मोपर® प्रीमियम ब्रँड अनुभव मोठ्या शहरांच्या केंद्रापासून दूर राहणाऱ्या ग्राहकांच्या घरी नेण्यात येईल. जीप कनेक्ट आऊटलेट्स विक्री तसेच सेवा देतात आणि ती पुणे, रोहतक, अहमदाबाद, मुवतपुझा, पानिपत, विलासपूर आणि वारंगळ येथे उघडण्यात आली आहेत. रिटेल नेटवर्कच्या विस्ताराबरोबरच, एफसीए इंडिया देशभरात आपले आफ्टर सेल्स विस्तारित करण्यासाठीही कार्यरत आहे. या कंपनीची आता ८४ मोपार वर्कशॉप्स आहेत. ती जीप, फियाट व अबार्थ ग्राहकांना सेवा आणि काळजी देण्यासाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांनी युक्त आहेत.
फ्लिन म्हणाले की, “आम्ही अगदी सुरूवातीपासूनच उच्च दर्जा ठेवल्यामुळे आमच्या जीप कंपास मालकांच्या ग्राहक समाधानाच्या स्वरूपात फायदा मिळाला आहे. हे फक्त रिटेल अस्तित्व नाही तर आफ्टर सेल्स वचनबद्धता आहे, ज्यावर आम्ही २०१९साठी लक्ष केंद्रित केले आहे. आमची आगामी उत्पादने, अत्यंत टणक जीप ट्रेलहॉक आणि नवीन पिढीच्या जीप रँगलर अनलिमिटेडमुळे आम्हाला आमचे अस्तित्व विस्तारित करणे आणि ग्राहक अनुभव तसेच व्याप्ती वाढवणे आवश्यक ठरेल.''
एफसीएकडून मेड इन इंडिया जीप कंपास त्यांच्या पुणे शहराजवळील रांजणगाव संयुक्त विद्यम उत्पादन सुविधेत उत्पादित केली जाते. या कारखान्यात फियाट आणि अबार्थ कारलाइन्सचीही निर्मिती केली जाते.