नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपुरात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षासोबत जनतेत स्वतःचा चांगलाच मार्केट केलेल्या काँग्रेस आ.विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी आता वाढतांना दिसत आहे,त्याला कारण म्हणजे चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटें,सुभाष धोटेंच्या एका वक्तव्यामुळे आ. विजय वडेट्टीवार अडचणीत आले आहेत, त्यांना जागोजागी जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे.
सोमवारी काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत सुभाष धोटेंची जीभ घसरली,ते बोलले कि निर्भया' किंवा पॉकसो कायद्याअंतर्गत राज्य सरकारकडून 3 लाख किव्हा 5 लाख रुपयांची मदत मिळते. त्यामुळे अनेक तरुणी आणि त्यांचे पालक पैशासाठी गुन्हा नोंदवण्यासाठी पुढे येत आहेत, हासुद्धा पब्लिसिटीचा धंदा झाला आहे, असं वक्तव्य जिल्हाध्यक्ष सुभाष धोटें यांनी केले. हे वक्तव्य करताच काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटेचा विरोधक चांगलाच समाचार घेऊ लागले, सुभाष धोटे हे याच संस्थेचे अध्यक्ष आहे.
या वक्तव्यानंतर असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याची टीका व्हायला लागली,धोटेंनी हे वक्तव्य केले त्यावेळी वडेट्टीवार त्यांच्याच बाजूला विराजमान होते,हे विधान येताच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे व विरोधक या सह सर्वच मंडळी त्यांच्या मागे हात धुवून लागले,विषयाचे गांभीर्य पाहता विषय एकदम संवेदनशील होते,अश्यावेळी सुभाष धोटे यांनी असं बोलायला नको होतं,मात्र त्यांच्या एका वक्तव्याने त्यांचे आमदार व काँग्रेसचे नेतृत्व वडेट्टीवार अडचणीत सापडले.
काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे इन्फन्ट जिजसच्या ७ विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले होते. हे प्रकरण लोकसभा निवडणूक होत पर्यंत असे दडून राहिले कि कोणाला भनक देखील लागली नाही,मात्र निवडणूक संपताच इन्फन्ट जिजस संबंधी सर्व पात्र अडचणीत सापडले,इन्फन्ट जिजसच्या संवेदनशील विषयात आता आ.विजय वडेट्टीवार देखील गोवल्या गेले,सद्य जिल्ह्यात काँग्रेसचे नेतृत्व आ.विजय वडेट्टीवार करत आहेत,अश्यात सर्वच कामे त्यांच्या नेतृत्वात होत आहेत.
काँग्रेसची लोकसभा निवडणुकीला कोणाला उभ करायचं,निवडणूक कशी जिंकायची,याच सोबत जिल्ह्यात एखादी पत्रपरिषद घ्यायची असेल तर वडेट्टीवार यांची परवानगी व त्या पत्रपरिषदेत वडेट्टीवार यांची उपस्थित राहत असे,सध्याचे काँग्रेस नेतृत्व तेच असल्याने त्यांनी आपली जबादारी म्हणून सुभाष धोटें यांनी केलेल्या वक्तव्याला शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र हे प्रकरण वडेट्टीवार यांच्या इतकं अंगलट येईल कि त्यांनी त्याचा विचार देखील केला नसावा.
सुभाष धोटें यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आदिवासी समाज बांधव वडेट्टीवार व धोटे यांच्यावर नाराज झाले आणि त्यांच्या प्रतिमेला चपलांचा माराला समोर जावे लागले, बुधवारी देखील राजुरा तहसिल समोर आदिवासींचा बेमुदत धरणे आदोलन सुरु केले.आंदोलनाची सुरवात सुभाष धोटे, अरुन धोटे, विजय वड्डेट्टीवार यांना चपलाचा हार टाकुन करण्यात आली.या प्रकारामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट वडेट्टीवार यांनी माफी मागितल्यानंतरही कायम आहे.
मंगळवारी आदिवासी महिलांनी याचा तीव्र निषेध केला. जागोजागी काँग्रेसविरोधात आंदोलने सुरू आहेत,साहजिकच एखाद्या समाजाबाबद एखाद्या जबाबदार व्यक्तीने असे विधान केले असेल तर त्या समाजबांधवांच्या भावना नक्कीच दुखावणार,या ठिकाणी देखील असेच झाले.या एका प्रकरणामुळे वडेट्टीवार व नुकतेच काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढविणारे बाळू धानोरकर याच सोबत विधान करणारे धोटे हे एकाच्या चुकीमुळे सापडले.
मंगळवारी आदिवासी समाज बांधवांनी बाळू धानोरकर, सुभाष धोटे आणि विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमांना जोडे मारल्या गेले.त्याच सोबत त्यांचे फलक जाळून वडेट्टीवार आणि सुभाष धोटे मुर्दाबादचे नारे लावल्या गेले.या ब्यानरवर सोमवारच्या पत्रपरिषदेचाच फोट लावण्यात आला होता, धोटे यांच्या वक्तव्यामुळे वडेट्टीवारांना फटका बसत त्यांची चंद्रपुरात लावलेली प्राण प्रतिष्ठा कुठेतरी विरघडु लागली आहे,यातच दुसरा गट देखील दुरून डोंगर साजरे म्हणत" ये क्या हो रहा है "बघत आहेत,या संपूर्ण प्रकरणात मंगळवारी वडेट्टीवार यांना दुसरी पत्रपरिषद देवून माफी मागावी लागली,मात्र यावेळी विधान करणारे सुभाष धोटें हे मात्र या पत्रपरिषदेत उपस्थित नव्हते.
मी सुभाष धोटे यांना या प्रकरणातून जोपर्यंत निर्दोष सुटका होत नाही तोपर्यंत काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदापासून दूर राहण्याची विनंती करणार आहे सर्व आरोपातून निर्दोष सुटका झाल्यानंतर परत हे जिल्हाध्यक्षपद त्यांना देण्यात येईल. मी मी स्वतः सुभाष धोटे यांना जिल्हाध्यक्ष पदापासून दूर राहण्याची विनंती करणार आहे. असेल विजय वडेट्टीवार पत्रपरिषदेत बोलताना म्हणाले.
येत्या काही महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहे,खासदारकीचा ऑफर नाकारत वडेट्टीवार यांनी विधानसभा माझे लक्ष असल्याचे सांगत लोकसभेची खासदारकीची हातातून गेलेली सीट हि बाळू धानोरकर यांना मिळवून दिली, यावेळी वडेट्टीवार यांची ताकद सर्वांनी लक्षात आली होती.याच असंवेदनशील वक्तव्याची तक्रार आमदार शोभाताई फडणवीस यांनी महिला आयोगाकडे केली होती,त्यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत महिला आयोगाकडील तक्रारीचा उल्लेख देखील केला होता,अश्यातच बुधवारी महिला आयोगाकडून विजय वडेट्टीवार,सुभाष धोटे,बाळू धानोरकर यांना नोटीस देण्यात आले. 30 एप्रिल रोजी स्वतः उपस्थित राहून त्यांना महिला आयोगाकडून जाब विचारला जाणार आहे. बुधवारी संध्याकाळच्या दरम्यान चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन येथे सुभाष धोटे व व इतर तीन अशा आशयाची ॲट्रॉसिटी ची तक्रार दाखल केली आहे .यावर पोलिसांनी सुभाष धोटे व इतर तीन अशा गुन्हा नोंद केला आहे. ज्या व्यक्तीने तक्रार केली आहे त्याने गैरहजर असणाऱ्या तिघांनाही तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
सध्या विजय वडेट्टीवार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात चांगले काम करत आहेत,असे तेथील नागरिक म्हणतात, लोकसभा निवडणुकीत त्यांनी धानोरकरांसाठी आपली ताकद लावली होती. याची सर्वांना कल्पना आहे, मात्र पक्षातील एका मित्राच्या वक्तव्याने वडेट्टीवार हे अडचणीत आले.त्यामुळे या वक्तव्यात जरी वडेट्टीवार यांनी माफी मागितली असेल तरी मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकी परियंत वडेट्टीवार या प्रकरणातून कसे बाहेर पडतात,धोटेनवर व संस्थेवर काय कारवाई होते,व त्यांना बाहेर पडण्यासाठी किती परिश्रम करावा लागेल हे मात्र येणारी वेळच ठरवणार आहे.