चंद्रपूर/प्रतिनिधी:
गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ढगे यांना चंद्रपूर लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे भद्रावती येथील रहीवासी असून तक्रारदार यांचेवर कार्यवाही न करण्याच्या व मोबाईल परत देण्याच्या कामाकरीता ढगे मॅडम यांना लाच म्हणून ७ साजर रुपयाची मागणी केली होती मात्र तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांचे विरुध्द लाप्रवि. कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०६.०३.२०१९ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये लाचेचीमागणी स्पष्ट झाल्याने पोलीस स्टेशन भद्रावती येथील शासकीय निवास्थानात पंचासमक्ष केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी शुंभागी गुणवतराव ढगे, वय ३० वर्षे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन भद्रावती यांना लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नागपुर श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नागपूर दुद्दलवार,पोलीस उपअधिक्षक श्री. विजय माहूरकर ला.प्र.वि.नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक डी एम घुगे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पुरुषोत्तम चोबे,पोलीस निरीक्षक तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ.महेश मांढरे, संतोष येलपूलवार, रवि ढेगंळे, मपोकॉ. समीक्षा भोगळे व चापोकॉ. राहूल ठाकरे यांनी यशस्वी पार पाडली आहे.