Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

बाफणा परिवार सगाई करायला आले आणि लग्न करून गेलेत

शुभम बाफणाने साखरपुड्यातच केले लग्न

खबरबात / सौ. मनिषा गणेश कोचर , धुळे

*शिरपूर*  :  कुठल्याही समाजात लग्न म्हटल्यावर हुंडा हा शब्द वरा करील मंडळींन कडून निघतो परंतु जैन धर्मियांचे आचार्य भगवंत १००८ पूज्यश्री रामलालजी महाराज यांच्या उत्क्रांती विषयावर नियमितपणे चालणाऱ्या प्रवचणातून प्रेरणा मिळाल्याचे वर पिता सुनील बाफणा यांनी सांगितले आचार्य भगवंत नेहमी प्रवचणाच्या माध्यमातून संदेश देतात कोणतेही कार्यक्रम करा कमीत कमी खर्चात करा महाराजांच्या विचारातून मी हा लग्न सोहळा साखरपुड्यातच करण्याची तयारी केली शिरपूर तालुक्यातील एका लहानशा गावातील व सध्याच्या परिस्थितीत शिरपूर शहरात वास्तव्यात असलेले प्रसिद्ध व्यापारी सुनील बाफणा व अशोक बाफणा यांनी व बाफणा परिवाराने कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता तसेच हुंडा हा शब्द न वापरता तसेच मानपान न घेता त्यांनी या गोष्टींना फाटा देत आपल्या एकलौता एक मुलाची कुठल्याही प्रकाराची हौसमौज न करता साखरपुड्यातच लग्न उरकवण्याचा निर्णय घेतला

   जालना येथील प्रतिष्ठित व्यापारी प्रविण कीशनलाल मोदी यांच्या मुलीचे लग्न कुठल्याही प्रकाराची हुंडा व अलंकार न घेता लग्न झाल्या चे सांगितले 

 शिरपूर शहराचे बाफणा परिवारातील मुख्य सदस्य सगाई करण्याच्या उद्देशाने जालना येथे गेले होते पण वरिष्ठांनी पुढाकार करित  सगाई मध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघी मंडळींनी दोन तासातच *चट मांगणी पट विवाह* पार पाडला लग्न सांगितले की अनेक 

दिवसापासून दोघी कडच्या मंडळींना लग्नाची मोठी तयारी करावी लागते त्याचबरोबर काही महिन्या अगोदर भवन बुक करणे , कँटर्स , लग्नविधी करिता ब्राह्मण , बँण्ड , डिजे , लग्नपत्रिका , फोटोग्राफ घोडा , अशा अनेक प्रकारच्या बारीक बारीक साहित्य बुक करावे लागतात तसेच वर राजा कडून वधूला लागणारे साहित्य बेस , शालू , चुनीबेस , अलंकार आदी प्रकाराची खरेदी करावी लागते या गोष्टी ला बाफणा व मोदी परिवाराने समाजा समाज आदर्श ठेवला यासाठी वधू पित्याला व वर पित्याला मोठी कसरत करावी लागते कुठलाही विनाकारण खर्च न करता साखरपुड्यातच लग्न केल्याची चर्चा जालना शहरासह शिरपूरात झाली

  जालना शहरातील प्रसिद्ध व्यापारी प्रविण मोदी व आई सौ.सुवर्णा मोदी यांची सुकन्या रेश्मा मोदी ची सगाई शिरपूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुनील बाफणा व आई सौ.मनिषा बाफणा यांचे सुपुत्र शुभम बाफणा यांच्या सगाई चा कार्यक्रम ता. 1 मार्च रोजी जालना येथे आयोजित करण्यात आला होता 

 सगाई च्या कार्यक्रमात बाफणा परिवाराकडून 15 ते 20 लोक गेली होती सगाईचा कार्यक्रम दुपारी पार पाडला वधू पक्षा कडील व वर पक्षाकडील प्रमुख लोकांनी साखरपुड्यातच लग्नाचा विषय घेतला दोघी कडील मंडळीने याविषयावर मंजुरी दिली कुठल्याही प्रकारचा हुंडा व एक रुपया न घेता लग्नाची तयारी दर्शविली याप्रसंगी उपस्थित पाहुणेमंडळी चकीत झाले साखरपुड्यातच शुभम व रेश्मा या दोघ दांम्पत्यांची लग्नाची रेशम गाठ बांधली गेली लग्नसमारंभात लागणारा विनाफालतू खर्च न करता सायंकाळी उपस्थित पाहुणेमंडळीच्या साक्षीने फेरा घेतल्यावर मोदी परिवाराची लेक बाफणा परिवाराची सुन झाली रात्री रेश्माची बिधाई करण्यात आली यावेळी मोदी परिवारातील सदस्यांचे मन गहिवरले होते 

वर राजा व वधूराणी कडील मंडळी सर्वच बाबतीत सक्षम असून ही जर दोघी मंडळींनी मनात विचार केला असता तर शाहिन लग्न झाले असते पण समाजाला दोघ परिवाराने आदर्श विवाहा चा संदेश देत शुभम बाफणा हा बाफणा मेडिकल चे संचालक व धुळे जिल्हा केमिस्ट असो.चे खजिनदार अशोक बाफणा यांचा पुतण्या आहे या घडलेल्या आदर्श विवाहाचे साधुमार्गी संघाचे अध्यक्ष तथा वराचे काका विजय बाफणा यांनी कौतुक करून नवदाम्पत्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.