सिंदेवाही /प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमाडी येथे मुलांच्या शिक्षणात माता पालकांचा आणि गावकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी महिला सक्षमीकरण मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांसाठी गावातील कर्तबगार महिलाचे मनोगत ठेवण्यात आले. आणि धावणे ,संगीत खुर्ची, गीत गायन इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला.
गावातील उध्दोगपती , नोकरीदार, या लोकांची विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी याकरिता गावातील जी लोक बाहेर गावत नोकरी करीत आहेत , मोठ्या उध्दोगधंद्यावर कार्यरत आहेत अश्या लोकांचे शाळेचे वतीने मान्यवरांच्या हस्ते टँफी देऊन सत्कार करण्यात आले .विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सामुहिक नृत्य ,एकल नृत्य ,नकल यांच्या माध्यमातून आपल्या अंगी असलेल्या कला कौशल्य दाखवून प्रेक्षकांचे मन जिंकले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मूलरीधर सोनवणे सेवा निवृत्त शिक्षक ,उद्घाटक सौ सीमा सहारे कांग्रेस महिला तालुका अध्यक्ष ,सौ रुपाली रत्नावार सरपंच ग्राम पंचायत मुरमाडी तसेच प्रमुख पाहुणे दुमाजी दांडेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केंद्रप्रमुख श्री शेंडे सर, उपसरपंच श्रीधर सोवनवे,पोलीस पाटील नंदूजी मोहूर्ले, तंटा मुक्त अध्यक्ष अनिल ढोक,धान्य व्यापारी सरडपार आंबदासजी कोसे, अंगणवाडी सेविका, वन अधिकारी, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन सर्व प्रतिनिधी ,गावातील प्रतिष्ठित नागरिक,युवक मंडळ, ग्राम पंचायत सर्व सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य
सत्कारमूर्ती गावातील सरकारी नोकरी असलेले युवक , उध्दोगपती गावातील नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्यध्यापक सौ तनीरवार मॅडम संचालक श्री बन्सोड सर
तर आभार श्री शेंडे सर यांनी केले.
कार्यक्रमकरिता शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती ,युवक मंडळी यांनी परिश्रम घेतले.