Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

लिफ्टमधे अडकलेला मुलगा सुखरुप बाहेर; वडिलांना अश्रू अनावर

दत्ताञय फडतरे (पुणे )- 

 दुपारी बारा वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे एक युवक चेतन ओसवाल (वय ३९) हे विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने एका इमारतीत लिफ्टमधे तासभर अडकले असून ते खुप घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्यांना लवकर वाचवा असा फोन त्यांच्या वडिलांकडून आ़ला. 


सदर घटना भवानी पेठेतील भवानी माता मंदिरासमोर तिरुपती सहकारी संस्था या इमारतीत घडली. नियंत्रण कक्षाकडून तातडीने मदत पाठवली गेली. जवानांनी तिथे जाऊन पाहिले तर पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या मधोमध लिफ्ट अडकली असून अडकलेला युवक व त्याचे वडिल खुपच घाबरले आहेत. दलाच्या जवानांनी “आता आम्ही आलो आहोत. तुम्ही घाबरु नका. पाचच मिनिटात तुम्ही सुखरुप बाहेर याल” असे सांगितले. नंतर लिफ्ट रुममधे जाऊन जवानांनी तिथे असलेल्या एक चकती टॉमी बारच्या साह्याने फिरवून लिफ्ट पहिल्या मजल्यावर घेतली व युवकाची पाचच मिनिटात सुखरुप सुटका केली.


त्यावेळी तिथे असलेल्या वडिलांना आपला मुलगा सुखरुप बाहेर आला हे पाहून अश्रु अनावर झाले नाहीत. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसमोर हात जोडत अश्रु पुसतच व तुम्ही देवासारखे पाचच मिनिटात धावून आलात त्याबद्दल आभार मानले. तसेच तेथील स्थानिक सभासद मा. मनीषा लडकत यांनीदेखील जवानांचे अभिनंदन केले. यावेळी दलाचे प्रभारी अधिकारी सचिन मांडवकर, वाहनचालक राजू शेलार, तांडेल राजाराम केदारी, जवान मंगेश मिळवणे, रऊफ शेख, योगेश चोरघे, प्रताप फणसे, अक्षय शिंदे, विठ्ठल शिंदे,रोहीत रणपिसे यांचा सहभाग होता.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.