पुणे,- भारत सरकारतर्फे दिला जाणारा “EASE - ईझ” अर्थात एन्हांस्ड अॅक्सेस अँड सर्व्हिस एक्सलन्स” बँकिंग सुधारणा पुरस्कार केंद्रीय अर्थमंत्री श्री अरुण जेटली यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्रला दिला गेला. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव तसेच कार्यकारी संचालक श्री ए सी राउत यांनी ‘शीर्ष सुधारक’ गटातील प्रथम उपविजेता पुरस्कार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दिल्ली मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात स्वीकारला.
“ईझ” हा भारत सरकारतर्फे सादर केला गेलेला उपक्रम आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुधारणेबाबत भारतीय बँक्स संघटनेच्या (आयबीए) माध्यमातून हा उपक्रम देशातील सरकारी मालकीच्या बँकाकरीता राबविला गेला आहे. बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप (बीसीजी) ही अग्रगण्य संस्था आयबीएने या कामासाठी नियुक्त केली गेली होती आणि तिच्या माध्यमातून सहा विषयांतर्गत येणार्या 140 उद्देशांच्याद्वारे सरकारी मालकीच्या बँकांच्या कामगिरीबाबत अभ्यास बीसीजीद्वारे केला गेला. बँक ऑफ महाराष्ट्राने या सहाही विषयांतर्गत सुधारणेमध्ये प्रशंसनीय कामगिरी करून शीर्ष सुधारक’ श्रेणीतील उपविजेता पुरस्कार पटकावला आहे.
पुरस्कार प्राप्त केल्यावर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री राजीव म्हणाले, “हा पुरस्कार प्राप्त करताना बँकिंग सेवांबाबतीतील यापेक्षा अधिक श्रेष्ठ सुधारणा करण्याची आमच्यावरील जबाबदारी खात्रीने वाढली आहे. आमच्या सर्व भागधारकांच्या अपेक्षांप्रत राहण्याचा आमचा पराकाष्ठेचा प्रयत्न असेल. हा पुरस्कार म्हणजेच आमच्या सर्व सन्माननीय ग्राहक यांच्या प्रती बांधीलकी असल्याचा आम्ही आणि बँकेचे कर्मचारी पुनरुच्चार करतो. एक जबाबदार आणि स्वच्छ बँकिंग सेवा देण्यासाठी तसेच “ईझ” हा विषय पुढे नेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र सातत्याने प्रयत्न करेल.”
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कार्यक्रमामध्ये पहिल्या “ईझ” अंतर्गत सुधारणा विषयक अहवालाचे अनावरण केले आणि विविध श्रेणीतील सरकारी मालकीच्या पुरस्कार प्राप्त बँकांना सन्मानित केले. अहवालाचे अनावरण केल्यानंतर श्री जेटली म्हणाले की, या क्रमवारीमुळे स्पर्धात्मकता वाढते आणि बँकांना इतरांपेक्षा अधिक उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते.
जून 2017 पासून बँक ऑफ महाराष्ट्रने विविध संरचनात्मक, पद्धतशीर आणि रणनैतिक बदल अवलंबिल्याने कार्यरत कार्यक्षमता, मालमत्तेची गुणवत्ता आणि ताळेबंद यामध्ये सुधारणा झाली आहे. बँकेच्या टर्न-अराऊंड धोरणामुळे प्रभावी मूल्य-व्यवस्थापन आणि पद्धती आणि एकाच भागातील शाखांच्या सुसूत्रीकरणामुळे वृद्धीला चालना मिळाली आहे. बँक प्रगती वृद्धीसाठी मार्गक्रमण करत असून भविष्यात किरकोळ कर्जे (रिटेल), कृषी आणि लघु उद्योग सारख्या प्रमुख क्षेत्राला वित्त पुरवठा वाढवण्याचे उद्दीष्ट ठेवत आहे.
बँकेला नुकताच आयबीएचा उत्कृष्ट माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील माध्यम श्रेणीतील बँकेमधील जोखीम व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षेमधील पुढाकार या अंतर्गत असणारा प्रतिष्ठीत पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.