- - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
- *नागपूर मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते विडीओ लिंकव्दारे लोकार्पण संपन्न
- नागपूरच मेट्रोची संरचना अव्दितीय
- -केंद्रीय रस्ते वाहतूक ,महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
- एकविसात्या शतकातील नागपूरची सुरूवाल मेट्रोने सुरु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. 7 मार्च 2019
महाराष्टाच्या उपराजधानीला मेट्रोची भेट मिळाली असून नागपूर मेट्रो ही देशातील सर्वात ग्रीन मेट्रो आहे. आपण 2014 मध्ये या प्रकल्पाचे भूमीपूजन केले व मेट्रोच्या खापरी ते सिताबर्डी या 13.5 किमी लांबीच्या पहिल्या चरणाचे उदघाटन आज आपल्या हस्ते होण्याचे सौभाग्य आपणास प्राप्त झाले आहे, नागपूरवासीयांना चांगली, सुविधाजनक, किफायशीर व पर्यावरणपूरक अशी मेट्रोची सुविधा यामुळे उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले . वर्धा रोडवरील साऊथ एयरपोर्ट मेट्रो स्टेशनवर महामेट्रोव्दारे आयोजित नागपूर मेट्रोच्या लोकार्पणाप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे संबोधित करतांना ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फ़डणवीस -केंद्रीय रस्ते वाहतूक ,महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी , केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत प्रामुख्याने उपास्थित होते
पूर्ण देशाच्या परिवहन गरजासाठी ‘वन नेशन-वन कार्ड’ ही नवीन व्यवस्था संचालित करण्यात आली असून यामुळे विविध शहरात वेगळे कार्ड वापरण्याची गरज भासणार नाही. पूर्णत: भारतात विकसित झालेले हे कार्ड डेबिट व मोबिलीटी कार्ड म्हणून काम करेल यातून ऑनलाईन पेमेंट तसेच मेट्रो, रेल्वे, बस या सेवांचा लाभ आता नागरिकांना घेता येईल, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.
नवी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरासिंगव्दारे हिरवी झेंडी दाखवून नागपूर मेट्रोचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलें
नागपूरातील शासकीय मालकीच्या जागा मेट्रोला हस्तांतरित केल्यामूळे म.न.पा.ला कराच्या स्वरूपात लाभ मिळणार असून मेट्रोही या जागांचा विकास करणार आहे, यामूळे नागपूरातील यशवंत स्टेडीअम, संत्रा,खवा मार्केट यांचा विकास होणार आहे. अंबाझरीतील मेट्रो स्थानका जवळ फुडकोर्ट व बोटपर्यटनाची सुविधा शहणार असून अंबाझरी वनपर्यटनाची संधीही वन मंत्रालयातर्फे उपलब्ध होणार आहे. यामूळे एक ‘पर्यावरण स्नेही मेट्रो’ म्हणून नागपूर मेट्रोची ओळख निर्माण होईल. सौर उर्जेच्या सहाय्याने 65 टक्के विद्युत उर्जा मेट्रोव्दारे वापरली जात असून देशातील ;ग्रीनेस्ट मेट्रो’ म्हणून नागपूर मेट्रो उदयास आली आहे, असे मत -केंद्रीय रस्तें वाहतूक ,महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी मांडले.
एकसिव्या शलकातील नागपूरची सुरुवात ही ख-या अर्थाने आज नागपूर मेट्रोच्या लोकापर्णाने झाली आहे. मेट्रो ही किफायतशीर सक्षम व पर्यावरण पूरक असून यामूळे नागपूरला नवी ओळख प्राप्त झाली आहे. ट्रान्झिट ओरीएंटेड डेवलपमेंट (परिवहनाधारित विकास) अंतर्गत मेट्रो स्थानकाच्या 500 मीटरच्या परिसरात चटई क्षेत्र निर्देशांक (एफ. एस. आय.) वाढवीण्यात आला असून यामूळे राजस्व संकलन वाढून याचा मोबदला मेट्रोला मिळ्त असून नागरिकांना ही सुविधा मिळत आहेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
नागपूर मेट्रोने ‘ ट्रान्सफॉर्मिंग नागपूर’ व ‘ माझी मेट्रो’ या ब्रीदवाक्याला अनुसरुन मेट्रोला अधिकाधिक लोकाभिमुख बनवण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत महामेट्रो नागपूरचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले.
केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे सचिव व महामेट्रोचे अध्यक्ष दुर्शाशंकर मिश्रा यांनी नागपूर मेट्रोचे टी.ओ.डी. धोरण,मुद्रांकशुल्कामध्ये मेट्रोशुल्काचा अंतर्भाव या पथदर्शी धोरणांचा विशेष उल्लेख केला व इतरही राज्यात मेट्रो बाबत याचा अवलंब केला जाईल असे सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी ‘ माझी मेट्रो: अ ड्रीम कमींग़ ट्रू’ या प्रदर्शनीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ‘ ‘‘मीट नागपूर मेट्रो’ या कॉफी टेबल बुकचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महामेट्रोचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनीधी नागरिक उपस्थित होते.