Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च ०७, २०१९

प्रकाश देवतळेंना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदाची जबाबदारी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image may contain: Datta Hajare, closeup
 चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निर्देशावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी देवतळे यांच्याकडे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून देवतळे यांनी सलग पाच वर्षे जबाबदारी सांभाळली. या कार्यकाळात बुथस्तरावरील कमिट्या, बूथ समन्वयक, शक्ती ॲपचा प्रचार व प्रसार, तालुकास्तरावरील ब्लॉक काँग्रेस कमिट्या अद्यावत करण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. सोबतच ग्रामीण व शहरी क्षेत्रातील जनतेला काँग्रेस पक्ष नोंदणीच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या संख्येने जोडले आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच देवतळे यांच्या जागेवर जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर त्यांना जिल्हा काँग्रेसमधून थेट प्रदेश काँग्रेस कमिटीवर बढती देण्यात आली आहे. काही दिवसातच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी प्रकाश देवतळे यांना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी स्थान देवून पक्षसंघटनेत मोठी जबाबदारी सोपविली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.