नागपूर/प्रतिनिधी:
वरिष्ठ महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापकपदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेतली जाणारी यूजीसी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) २० ते २८ जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी १ मार्चपासून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. नेट परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये पहिल्यांदा ऑनलाइन पद्धतीने नेट परीक्षा घेण्यात आली होती