चंद्रपूर- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे चार महिन्यांचा थकित पगार तसेच किमान वेतन या मागण्यांसाठी मागील 2 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे.आज या आंदोलनाचा सहावा दिवस होता. आंदोलनकर्त्या कामगारांनी सामान्य रुग्णालयाच्या आवारामध्ये सकाळी दहा ते पाच धरणे आंदोलन देणे सुद्धा सुरू केले होते. आज सात मार्चपासून कामगारांनी धरणे आंदोलनाची जागा बदलून जटपुरा गेट येथे साखळी उपोषणाला सुरुवात केली.दिनांक 8 मार्च पासून हे आंदोलन तीव्र करण्यात असल्याची माहिती जन विकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे पप्पू देशमुख यांनी दिली. आज 7 मार्च रोजी सुरू झालेल्या साखळी उपोषणामध्ये सतीश येसांबरे,सतीश घोडमारे, अमोल घोडमारे, सागर हजारे,कांचन चिंचेकर,शेवंता भालेराव,विश्रांती खोब्रागडे,भाग्यश्री मुधोळकर, बबीता लोडेल्लीवार, उज्वला रामटेके या दहा कामगार कामगारांनी सहभाग घेतला. साखळी उपोषणामध्ये दररोज दहा कामगार सहभाग घेणार आहे. साखळी उपोषणाची दखल न घेतल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा सुद्धा कामगारांनी दिलेला आहे
सरकारी दवाखान्यातील कामगारांचे साखळी उपोषण