कोंढाळी/प्रतिनिधि-दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी-रिधोरा वीज वीतरण कंपनी चे नियम बाह्य कामा मुळे कोंढाली येथील शेतकरी मेटाकुटिस आला आहे । संबधित शेतकर्यां ने राज्याचे उर्जा मंत्री, पालकमंत्री, काटोल चे तहसीलदार, तसेच वीज वितरण कंपनी चे काटोल व कोंढाळी येथील अधिकार्यांना तक्रारी देऊनही शेतकर्याला न्याय मिळत नाही। आता जिल्ह्यचे पालकमंत्री यांचे कार्यालयातून काटोल चे उपविभागिय अधिकारी यांना ही या प्रकरणी चौकशी करन्याचे सुचविले आहे।
या प्रकरणी माहिती अशी की कोंढाळी निवासी नारायण संतोष चन्ने यांचे शेत खापा सोनार या शिवारात आहे सर्हे क्रमांक 134/136आहे,या शेतातून आधीच चार उच्च दाबाच्या वीज वाहिण्या गेल्या आहेत, व मागील दोन महिने पुर्वी आणखी पाचवी 33के व्ही ची वीज वाहिणी घालते गेली ,या प्रसंगी शेतकरी पुर्ण पने हतबल झाला आहे । टाकलेली वीज वाहिणी चे काम ही निकृष्ट आहे । तरी या शेतकर्याला न्याय देणार तरी कोण? मिळालेली माहिती अशी आहे की या वीज वाहिणी चे बांधकाम करनारे कत्रांटदार जिल्ह्यातील वजनदार राजकिय व्यक्तीचे नजिकचा असल्याने वीज वीतरण कंपनी चे (इंफ्रा)चे अधिकारी या निकृष्टता व नियमबाह्यता ही खपवून घेत आहे । या प्रकरणी शेतकर्यां ला न्याय मिळावा ।