पुसेसावळी : खटाव तालुक्यातील कायम दुष्काळी भाग असलेल्या पुसेसावळीसह परिसरातील गावांना उरमोडीचे पाणी सोडावे अशी मागणी पुसेसावळीसह परिसरातील ग्रामस्थांमधुन होत आहे.
सध्या या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असुन याकडे प्रशानाकडून लक्ष देण्याची गरज आहे, तसेच या भागाला पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चार्याचाही प्रश्न भेडसावत अाहे, कायम दुष्काळांशी सामना करावा लागत असलेल्या या भागाचा चेहरा मोहरा उरमोडीच्या माध्यमातुन बदलेले या भावनेतुन इथल्या शेतकर्यांनी जमिनी दिल्या, गावागावाशेजारी पुर्नवसित गावे वसली परंतु या गावांना व इथल्या शेतकर्यांना उरमोडीचे पाणी योग्य प्रकारे मिळेना, तसेच एका तासाला एक ते दोन हजार रुपये भरा तरच पाणी मिळेल असा प्रशानाने निकष लावुन शेतकर्यांची लुटच चालु केल्याचे चित्र या भागात दिसत आहे, तरी या भागातील गावोगावचे टंचाईग्रस्त परिस्थती असलेलेचे ठराव पंचायत समितीमध्ये दिले असुनसुद्धा याकडे डोळेझाक केली जात असल्याचे गावोगावच्या ग्रामपंचायतीकडुन बोलले जात आहे, त्यामुळे प्रशासनाने या भागाला टंचाईच्या माध्यमातुन उरमोडीचे पाणी गावोगावच्या तलाव,अोढ्यांना सोडावे अशी मागणी जोर धरु लागली आहे,
उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यातून जात असताना इथल्या शेतकर्यांची तहान न भागवता वारंवार पाणी पुढच्या भागातच का जाते, यांचा प्रश्न या भागातील ग्रामस्थांना वारंवार पडत आहे.
सध्या पारगाव तलावामध्ये दहा ते पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असुन या तलावातुन पारगाव, पुसेसावळी' राजाचे कुर्ले या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतुन पाणी पुरवठा केला जातो तरी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे जनावरांना चारा पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे टंचाईतुन उरमोडीचे पाणी पारगाव तलाव व परिसरातील अोढयांना सोडावे
माजी जि.प.सदस्य
श्री.जितेंद्र पवार
(पारगाव)
या भागाला उरमोडीचे पाणी टंचाईच्या माध्यमातुन सोडुन या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा प्रशानाने याबाबत ठोस पावले उचलावीत, तरी या भागातील मागणी लवकरात लवकर पुर्ण करुन उरमोडी पाणी तलाव व अोढ्यांना सोडावे,
सौ.मंगलताई पवार ,
सरपंच (पुसेसावळी)