Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ३०, २०१९

आचारसंहितेचा भंग:प्राध्यापकला निवडणूक विभागाची नोटीस



सोशल माध्यमासंदर्भातील पहिल्या तक्रारीची चंद्रपूरात दखल

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सोशल मीडियाद्वारे आदर्श आचारसंहितेचा भंग होण्याची पहिली तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. फेसबुक वर प्रसारित झालेल्या व्हिडिओ चित्रफितीमध्ये चंद्रपूरमधील राजीव गांधी महाविद्यालयचे प्राध्यापक नामदेव वरभे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याची तक्रार जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्या व्हिडिओ चित्रफितीमध्ये एका विशिष्ट गटाचे काही समर्थक हे जातीच्या आधारावर एका प्रमुख पक्षाने एका विशिष्ट माणसाला उमेदवारी द्यावी असे आवाहन करतांना दिसत आहे. सदर प्राध्यापक हे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सामील असतांना या व्हिडिओ चित्रफितीमध्ये सहभागी असल्याची ही तक्रार आहे.


ही चित्रफीत सायबर सेल चंद्रपूरद्वारे व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीद्वारे तपासली गेली असता सदर प्राध्यापक त्या आवाहन करणाऱ्या व्यक्तींच्या बाजूला बसल्याचे दिसून येत आहे. सदर प्राध्यापकांची नेमणूक मतदान केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक विभागातर्फे करण्यात आली असून सदर व्यक्ती कुठल्याही राजकीय कार्यक्रमामधे, संदेशामध्ये, आवाहन, चर्चांमध्ये सहभागी असू शकत नसल्याने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याद्वारे सदर प्राध्यापकाला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांचे समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे. आदर्श आचारसंहीतेनुसार निवडणूक प्रक्रियेमधे सहभागी असणारी कुठल्याही व्यक्ती राजकीय कार्यक्रमामध्ये, संदेशामध्ये, आवाहनांमध्ये सहभागी होवू नये, असे आदेश आहेत.

निवडणुकी दरम्यान सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शाब्दिक वार, हल्ला-प्रतिहल्लाही सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्ष व उमेदवारांद्वारे सोशल मीडियावर भर दिला जात आहे. ट्‌विटर,फेसबुक, इन्स्ट्राग्राम, व्हॉट्‌सॲप, इंस्टाग्राम, डाउनलोडस द्वारे ‘सोशल मीडिया’चा वापर अधिक प्रभावीपणे करू लागले आहेत.. अनेक शासकीय - निमशासकीय आस्थापनांवरील कर्मचारी - अधिकारी तसेच सामान्य नागरिकांनी, विद्यार्थी यांनी या काळामधे कोणत्याही सोशल पोस्टमुळे आचारसंहिता भंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सद्या निवडणूक काळात सायबर सेल व एमसीएमसी समितीने लक्ष वेधले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.