Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २९, २०१९

कन्हान येथे सांस्कृतिक मेळावा; चिमूरातील कलावंतांचा समावेश

चिमूर:- दि.१४ मार्च २०१९ पासून ते १७ मार्च २०१९ ला कन्हान येथे आयोजित शासकीय सांस्कृतिक मेळावा संपन्न झाला.या सांस्कृतिक मेळाव्याचे भव्य आयोजन विदर्भ कलाकार परिषद चे केंद्रीय अध्यक्ष श्री.धर्मदासजी भिवगडे व संपूर्ण विदर्भ कलाकार परिषद यांनी आयोजित केला होता.त्यामध्ये ठिकठिकाणाहून कलावंत आपली कला दाखवण्यासाठी आले होते, त्याचप्रमाणे चिमूर तालुक्यातील अनेक मंडळे तसेच कलावंतानी प्रामुख्याने उपस्थिती नोंदवली.

       ग्रामीण भागातील कालावंतामध्ये अनेक लोककला असतात.पण त्या लोककलेला त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळत नाहीत.त्यामुळे तो ग्रामीण भागातील कलावंत हा मातीतच दळलेला असतो. त्याला त्या मातीचे सोने करता येत नाहीत. ग्रामीण भागात पूर्वीच्या काळापासून तर आता पर्यंत मनोरंजनाकरिता दंडार,गोंधळ,खडी गंमत,नाटक,भारूड,भजन,डाहाका असा अनेक लोककला मनोरंजनाकरिता ग्रामीण भागात सादर करीत असतात.पण याच सुप्त गुणांना जगाच्या पुढे आणण्यासाठी ग्रामीण कलावंतांना कालांमंच मिळत नसतो. याचे सर्वश्री भान ठेवत गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान हि संघटना ग्रामीण भागातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता कार्यरत आहे. 

         चिमूर तालुकाक्यातील विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे सदस्य श्री. शंकरजी रामटेके,श्री. दशरथ रामटेके, श्री. एकनाथ बोरकर यांच्या मार्गदर्शनार्थ निरगुण निराकार भजन मंडळ नवतळा, एकलव्य महिला दंडार मंडळ नवतळा, राष्ट्रीय कथासार गोंधळ पार्टी नवतळा, गुरुदेव भजन मंडळ नवतळा, राष्ट्रीय कथासार खडी गंमत कोटगाव,गुरुदेव महिला दंडार मंडळ कोटगाव, गुरुदेव भजन मंडळ काजळसर,नामदेव महिला भजन मंडळ कोटगाव, सावित्रीबाई फुले महिला दंडार मंडळ मेटेपार,सुचिता महिला दंडार मंडळ खापरी(डोमा),इन्साफ निळा निशाण खडी गंमत नवेगाव(पेठ), मंजुळा माता महिला भजन बोथली, शारदा महिला भजन मंडळ शिवापूर (बंदर),सरस्वती भजन मंडळ भांन्सुली(पेठ),माणिक गुरुदेव भजन मंडळ शेडेगाव,न्यू आदर्श महिला भजन मंडळ शेडेगाव,गुरुदेव भजन मंडळ शिवापूर (बंदर),गुरुदेव भजन मंडळ गडपीपरी,गुरु माऊली महिला भजन मंडळ पिंपळगाव, सद्गुरू भजन मंडळ पिंपळगाव,संत तुकोबा वारकरी भजन मंडळ पिंपळगाव,माँ माणिक डाहाका मंडळ पिंपळगाव इत्यादी मंडळ शासकीय सांस्कृतिक मेळाव्यास उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.