Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २९, २०१९

चंद्रपूरच्या प्रचाराला,उष्णतेचे चटके

भर उन्हात प्रचार साठी इमेज परिणाम
संग्रहित
ललित लांजेवार/नागपूर:
सध्या चंद्रपुरात दोन गोष्टींची चर्चा जोरात सुरू आहे. एक म्हणजे लोकसभा निवडणूक आणि दुसरे म्हणजे वाढता उकाडा. उन्हाळ्याबरोबरच आता निवडणुकीचे वारेही वाहू लागले आहेत. राज्यात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत संपली असून, पक्ष प्रचाराला मोठ्या थाटात सुरवात झाली आहे. अश्यातच आपल्या चाहत्या खासदाराचा गावभर प्रचार करतांना कार्यकर्ते चांगलीच मेहनत घेत आहेत.

 या वाढत्या उष्णतेमुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. गुरुवारी चंद्रपुरातील पारा चाळिशीच्या पार झाला ,अन कार्यकर्ते घामाचिप्प दिसले,चंद्रपुरची ओळख उष्ण शहर म्हणून आहे.सर्वत्र प्रचाराचे वातावरण असून चंद्रपूर सारख्या अति उष्ण शहरात आपल्या खासदाराच्या प्रचार करतांना काही मर्यादा येत आहेत. यासाठी सिनिअर कार्यकर्त्यांना  A/C गाडी देण्यात आली असून जुनिअर कार्यकर्ते हे सकाळी ८ ते १२ व दुपारी ४ ते रात्री परियंत कामाला लागले आहेत.

दुपारच्या वेळी रस्तेही ओस पडत आहेत. वाढत्या उन्हामुळे शरीराची लाही...लाही.. होत आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात या वेळी १३ उमेदवार आपले भविष्य आजमवित आहेत.पण प्रचाराचे दिवस असल्याने कडाक्याचे उन आणि उकाडा असूनही उमेदवार-कार्यकर्ते प्रचाराच्या रणात सर्व जोर लावून झुंजत आहेत.कार्यकर्त्यांना पेट्रोल नाश्ता ,जेवणाचा टेन्शन घेण्याची सध्या गरज नाही आहे, हा सर्व खर्च उमेदवार करत आहे,पुढील एक महिना हा खर्च कंपनी करणार आहे... प्रभागात स्थानिक नेत्याच्या नेतृत्वाखाली प्रचारफेरी काढण्यात येत आहे. सोसायट्या ,जेष्ठ नागरिक संघ,मंडळ यांना विश्वासात घेतले जात आहे, जे-काही असेल बघून घेऊ ....

सकाळपासूनच कडक ऊन पडत असल्याने दमछाक होत असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रचारफेरीसाठी निघताना प्रचाराच्या साहित्याबरोबरच बाटलीबंद पाण्याचे खोके सोबत ठेवावे लागत आहे.कुठी  थंड मठ्ठा तर कुणी निंबू पाणी पीत आहेत..सध्या दररोज रात्री मटन,चिकनवर ताव सुरु आहे.हा कार्यक्रम सतत एक महिना चालणार आहे.बिल कंपनी देणार आहे.....

डिजीटलचा जमाना असल्यामुळे पारंपरिक प्रचारपद्धतीबरोबरच नवतंत्रज्ञानाच्या सहायाने डिजीटल प्रचारावर भर दिला जात आहे.अश्यातच चंद्रपुरात काँग्रेसचे बाळू धानोरकर विरुद्ध भाजप उमेदवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यात यांच्यातच प्रामुख्याने चुरशीची लढत चंद्रपुरात बघायला मिळणार आहे,या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले राहणार आहे.

सध्या कॉंग्रेस विजयी वातावरण निर्मिती करत आहे,तर काही वृत्त वाहिन्यांचे पोल निवडणूक होण्या आधीच निकाल (कल) जाहीर करून पक्षाचे विजयी वातावरण निर्माण करत आहेत.  या संपूर्ण   निवडणूकीच्या सनात  चंद्रपूरच्या जनतेचा झुकता माप कोणत्या पक्षाला असेल हे सर्वांना निकालाच्या दिवशी समजणार आहे.  सद्या सर्वोच्च न्यायालयात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.  याचिकेवर १ एप्रिलला सुनावणी होणार आहे.

काय आहे विरोधकांची मागणी 
मतदान यंत्राद्वारे आपण ज्या उमेदवाराला मत दिले आहे त्यालाच ते मिळाले आहे की नाही, याची खातरजमा या यंत्राद्वारे येणाऱ्या पोचपावतीद्वारे मतदाराला करता येते. लोकसभा निवडणुकांमध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांपैकी किमान ५० टक्के यंत्रांमधील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह २१ विरोधी नेत्यांनी केली आहे.

विरोधकांची ही मागणी मान्य झाल्यास लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे ऐवजी 24 मे राजी जाहीर होऊ शकतो.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.