Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ३०, २०१९

मातोश्री सरुताई भगवंत प्रत्येक हृदयात विराजमान

  • आनंदसिद्ध काडसिध्देश्वर महाराज

मायणी, ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)

मायणीच्या मातोश्री सरुताई या शरीराने आपल्यात नाहीत जसे आपण एक कापडा बदलतो तसे सरुताई माऊली ने फक्त साडी बदलली आहे आज सरुताई माऊली प्रत्येक चराचरात आहेत प्रत्येक ह्रदयात भगवंत वास्तव्य करतो तो प्रगट करण्याचे काम संत करीत असतात हेच काम आयुष्यभर सरुताई माऊलेनी केले आहे त्यांच्या चरणाशी नतमस्तक होणे हेच भक्ततांचे कर्तव्य आहे मातोश्री सरुताई भगवंत आज प्रत्येक ह्रदयात विराजमान आहेत असे स्पष्टमत आनंदसिध्द काडसिध्देश्वर महाराज यांनी मायणी ता.खटाव येथील मातोश्री सरुताई प्रगट दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता येथे व्यक्त केले

प्रकट दिनाच्या निमित्ताने सकाळी ६ वाजता माऊलींचा अभिषेक करण्यात आला, यावेळी समाधी व संपूर्ण मंदिरात आकर्षक फुलांची आरास व सजावट करण्यात आली होती,सकाळी ९ वाजता आरती, व १२ वाजे पर्यंत भजन व माऊलींचे नामस्मरण चालले होते. तर ठीक १२ वाजता आनंदसिध्द काडसिध्देश्वर महाराज व श्री व सौ दिलीपराव येळगावकर यांच्या शुभहस्ते,व असंख्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत माऊलींच्या जयघोषात महाआरतीचा कार्यक्रम पार पडला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर आपले  विचार व्यक्त करताना आपल्या भाषणात म्हणले या मंदिरात पावित्र्य पाळले जातात हा ट्रस्ट राजकारण विरहीत असुन येथे सदगुणांची वाढ होते तर त्यांच्या आंगी दुर्जनांचा नाश म्हणून आम्ही येथे येणाऱ्या प्रत्येक प्रमुख पाहुण्याचा सत्कार करतो मातोश्री सरुताई माऊली चे भक्त सर्व महाराष्ट्रत आहेत याचा आभीमान आहे या भागात विकास ,शांतता, समृद्धी यावी अशी प्रार्थना मातोश्री सरुताईंच्या चरणी केली. 

या वेळी विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे प्रसंगी सरुताई माऊलीचे भक्त सौ .वदंना लिपारे यांनी आपल्या अथक प्रयत्नातुन 'ब्रह्मांडनायक' या मातोश्री सरुताई माऊली यांच्या जिवनातील व भक्तांना आलेल्या अनुभवावरील चरित्रग्रंथ लिहिला त्याचे प्रकाशन काडसिध्देश्वर महाराज डॉ.दिलीपराव येळगांवकर व सचिव रविंद्र बाबर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सौ.वंदना लिपारे यांनी ग्रंथा विषयी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थितांचे स्वागत हरिभक्त,कीर्तनकार,श्री लोहार गुरुजी यांनी केले व प्रशांत कुलकर्णी यांनी संचालन केले व आभार मानले यावेळी शेकडो भाविकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.