Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ३०, २०१९

बांबू हस्तकलेतून ग्रामीण महिला कारागिरांसह समुदाय समृद्ध होईल

प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम


चिमूर/रोहित रामटेके

   

     वृक्षारोपण, वन्यजीवांचे संरक्षण आणि गरीब समाजाचे सशक्तीकरण करण्यावर ग्रीन स्किल डेेवलमेंट प्रोग्राम  या  संस्थाचे  ( BNHS )काम गतिमान आहे. बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून  ग्रामीण महिला कारागीरांसह आर्थिकदृष्ट्या समृध्द होईल, असा विश्वास जाधव साहेब सहायक वनसंरक्षक यांनी व्यक्त केला.

पळसगाव येथील बांबू हस्तकला व कला केंद्र येथील महिलांना प्रमाणपत्र वितरण प्रसंगी  करताना व्यक्त केले ,

संस्थाचालक मा,संजय करकरे ,मा,सौ,संपदा  करकरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर प्रकल्पातून पळसगाव येथील महिला कारागिराचे या माध्यमातून समाजाला आर्थिक उन्नत करण्यासाठी मदत होईल. बांबूत रोजगार निर्मिती करून महिला कारागिरांना समुदायांना समृद्ध करण्याची प्रचंड आर्थिक क्षमता आहे. बांबूपासून तयार करण्यात येत असलेल्या राखी, स्वयंपाकघर, बास्केट, चटई, फर्निचर, फोल्डर फाईल,सारविंग बास्केट रोटी चिमटा,बांबू घरे यांना देशासह परदेशातही मोठी मागणी वाढत चालली आहे. या माध्यमातून नवा आर्थिक स्त्रोत निर्माण होणार आहे. या क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पना प्रोत्साहित करण्यासवाठी विविध उपाययोजना आखीत आहे .

ताडोबा बांबू क्राप्ट (BNHS) या संस्थेने चे काम  अत्यंत उत्कृष्टपणे सुरू असल्याचे मा,संजय करकरे म्हणाले,  बांबू प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या बांबू हा खऱ्या अर्थाने कल्परूक्ष असून सामान्य माणसाला समृध्द करण्याची यामध्ये ताकद आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी या क्षेत्रात कौशल्यवृध्दी करणे आवश्यक असून त्यादृष्टीने संस्था आणखी प्रयत्न करत आहे. व सादरणता लाखो रु 1 वर्षात कारागिरांना मेहनत दिली जात आहे, या नंतर गावातील होतकरू महिलांना रोजगार देण्याचा त्यांचा मानस आहे,या सर्व ही प्रशिक्षण केंद्रांचे परिवर्तन रोजगार निर्मिती केंद्रात करण्यासाठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्असून मार्केट साठी मोट्या जिकरीचे काम  असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल ऋतुजा जुंमडे ,सुरेखा शेंडे,यामीना जुमडे, जोति रामटेके,संघमित्रा खोब्रागडे,लता शेंडे,जस्मिता गुळधे, विना जुमडे, पूजा गोरडवार,जवळपास पंचवीस महिलांना  मा जाधव सहायक वनसंरक्षक साहेब. यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सुरूवातीला बांबू पासून बनविलेल्या ( BNHS ) संस्था  केंद्राच्यावतीने मांडण्यात आलेल्या बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तूंच्या  पाहणी केली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक -मा,बबन मडावी यांनी केले. तर आभार प्रभार -सुरेंद्र शिडाम यांनी मानले. यावेळी संस्था मधील ट्रेनर,लीलाधर आत्राम,बंडू मेश्राम,प्रमोद मेश्राम,पुंडलिक कळाम,भोजराज पेंदाम,चेतन आत्राम,पुणेश्वर मोहूरले, कार्यक्रमाला उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.