चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुक
चंद्रपूर दि.26 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये आज 26 मार्च रोजी अर्जाच्या छाननी नंतर 21 पैकी 17 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून अन्य 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी अखेर पर्यंत 21 अर्ज दाखल झाले होते. यापैकी पुढील उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये अपक्ष मिलिंद प्रल्हाद दहिवले, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे ॲड. भूपेश वामन रायपुरे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियातर्फे नितेश आनंदराव डोंगरे, अपक्ष अरविंद नानाजी राऊत, अपक्ष नामदेव केशव किनाके, प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियातर्फे मधुकर विठ्ठल निस्ताने, वंचित बहुजन आघाडीतर्फे राजेंद्र श्रीरामजी महाडोळे, इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे सुरेश नारायण धानोरकर, भारतीय जनता पार्टीतर्फे हंसराज गंगाराम अहिर, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दशरथ पांडुरंग मडावी, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे गौतम गणपत नगराळे,नव समाज पक्षातर्फे विद्यासागर कालिदास कासर्लावार, अपक्ष राजेंद्र कृष्णराव हजारे, बहुजन समाज पार्टी सुशील संगोजी वासनिक, गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे नामदेव माणिकराव शेडमाके, अपक्ष शैलेश भाऊराव जुमडे, अपक्ष अशोकराव तानबाजी घोडमारे यांचा समावेश आहे.
अवैध ज्यांचे अर्ज झाले त्यामध्ये अपक्ष रमेश मारोतराव कडुकर, अपक्ष अभिजीत राजू बेल्लालवार, अपक्ष अभिनंदन महादेव भेंडाळे,भारतीय मानवाधिकार पार्टीतर्फे दामोदर श्रीराम माथने यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची तारीख 28 मार्च असून 29 मार्च रोजी अंतिम उमेदवाराच्या यादीची घोषणा होणार आहे. या उमेदवारांना 9 एप्रिल पर्यंत प्रचार करता येणार असून 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.