नागपूर- भारतातील आपल्या कटिबद्धतेला आणखी मजबूत करण्यासाठी स्कॅनिया कमर्शियल व्हेइकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दळणवळण सोल्यूशन्स क्षेत्रातील 127 वर्षांचा इतिहास असलेल्या कंपनीने नागपुरात आपल्या सेंट्रल पार्ट्स गोदामाचे उद्घाटन करत असल्याची घोषणा केली.
भारताच्या केंद्रबिंदूत स्थित असलेल्या नागपूरात स्थापन करण्यात आलेल्या 30,000 चौरस फूटांवर पसलेल्या स्कॅनियाच्या या सेंट्रल पार्ट्स वेअरहाऊसमध्ये 8,500 पेक्षा अधिक स्टॉक कीपिंग युनिट्स आणि ऑफ रोड, ऑन-रोड आणि इंजिन उत्पादनांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना स्कॅनिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पीटर नोव्होटनी म्हणाले, ''एलअॅण्डटी या आमच्या सर्वांत मोठ्या वितरण भागीदाराच्या अधिक जवळ जाण्यासाठी या धोरणात्मक पावलाची आम्हाला मदत होत असून यामुळे आमची परिचालनात्मक क्षमता वाढीस लागणार आहे. परिणामी, भारतीय ग्राहकांसाठीच्या प्रक्रिया कालावधीत घट होऊन सर्व स्पेअर पार्ट्स देशाच्या कानाकोपऱ्यात योग्य उपलब्धतेसह पोहोचतील. यामुळे ग्राहकांनाही एकूण परिचालनात्मक सक्षमता (टीओई) अनुभवास येईल आणि ग्राहकांच्या आनंदाची हमी बाळगण्याच्या स्कॅनियाच्या तत्वज्ञानावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल.''
ते पुढे म्हणाले, ''आमच्यासाठी भारत ही महत्वाची बाजारपेठ आहे. नागपूर येथील केंद्रीय गोदाम हे कंपनीचे व्याप्ती धोरण असून देशाप्रति असलेल्या आमच्या प्रतिबद्धतेचे हे उदाहरण आहे. स्कॅनिया इंडियाच्या वृद्धीसाठी असे धोरणात्मक उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरतील, याची आम्हाला खात्री आहे.''
स्कॅनिया इंडिया सेंट्रल पार्ट्स गोदाम कलमेश्वर येथील लॉजिस्टिक्स पार्क येथे थाटण्यात आले आहे.
स्कॅनिया कमर्शियल व्हेइकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बद्दल
दळणवळण क्षेत्रातील १२७ वर्षांच्या समृद्ध परंपरेसह स्कॅनिया कमर्शियल व्हेइकल्स एबी ही कंपनी जगभरातील दळणवळण क्षेत्रातील वैविध्यपूर्ण बाजारपेठांमध्ये दर्जेदार सेवा व उत्पादने पुरवते. भारतात, स्कॅनिया कंपनीने २००७मध्ये बांधकाम व खाणकाम क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण केले आणि त्यासाठी लार्सन अॅण्ड टब्रो कंपनीशी भागीदारी केली. २०११मध्ये स्कॅनिया कमर्शियल व्हेइकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने भारतातील आपले अस्तित्व वाढवण्यात सुरूवात केली असून कर्नाटकातील बंगळुरू येथील नरसापुरा येथे ऑटोमोबाईल उत्पादन प्रकल्प कंपनीने स्थापन केला.