चिमुर/रोहित रामटेकेचिमूरपासून काही अंतरावर असलेले तुकुम येथील बळीराम सुदाम गजभिये यांच्या तणसाच्या ढगाला आग लागली या आगीने रोद्ररुप धारण करून भडका घेतला. यात तणसाचा ढग पुर्णता जळून खाक झाला.
तुकुम येथिल शेतकरी बळीराम सुदाम गजभिये यानी उन्हाळाची चाहुल लागताच चाऱ्या सोय मणून तणसाचा ढग गावालगत असलेल्या बैलाचा गोठया जवळ तणसाचा ढग करून ठेवला होता. परंतु काल दि. २४ ला सायंकाळी ७ च्या सुमारास बाजूला असलेल्या बैलाचा गोठया जवळ अचानक साकसर्कीट झाल्याने बाजुला असलेला तणसाचा ढगाला आग लागली. याबाबतची माहिती मिळताच नागरीकांनी आग विझविण्यासाठी तणसाचा ढगाकडे धाव घेतली.आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावकऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केला. या घटनेत कुठलेही जीवीतहानी झाली नाही. मात्र सुदैवाने मोठी जीवित हानी टळली यात संपूर्ण तणस जळून खाक झाली.
आग रात्रीच्या सुमारास तणसाचा ढगाला लागली. व आरडाओरड सुरू झाली.आग लागल्याचे कळताच संपूर्ण गाव आग विझविण्यासाठी धावपळ करू लागला. मात्र क्षणात आगीने रुद्र रूप धारण केले.गावातील लोकांनीही मिळेल तेथून पाण्याचा मारा सुरू केला.परंतु आग नियंत्रणात येत नव्हती. शेवटी तुकुम येथील पोलीस पाटील सजंय शेडामे यांनी आग लागल्याची माहिती चिमूर पोलीस स्टेशन व चिमूर तहसिल ला दिली. चिमूर चे तहसिलदार संजय नागतिळक यांनी समयसुचकता राखून तात्काळ घटना स्थळावर दोन अग्नीशामकदलाच्या गाडी बोलावून रात्री ११ च्या सुमारास आगीवर नियत्रंण मिळविण्याला अग्नीशामक दलाला यश आले. या आगीत तणसाचा ढग संपूर्ण जळून खाक झाल्यामुळे गजभिये यांना बैलाचा चाऱ्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.घटना स्थळावर जाऊन ढोले तलाठी यांनी पंचानमा करून पुढील कार्यवाहीसाठी वरीष्ठ अधिकऱ्यांकडे पाठवले आहे. तरी तात्काळ नुस्कान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.