Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ०५, २०१९

प्रहार संस्थेतर्फे विविध साहसी शिबिरे


नागपूर - प्रहार समाज जागृति संस्थे ने ९ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान आपले रजत जयंती सोहळा साजरा केला. प्रहार संस्थेला नेहमीच नागपूर करांच प्रेम व सहयोग हे मिळत आलं. त्याकरिता प्रहर संस्था सदैव नागपूर करांचा ऋणी राहील. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण प्रहार संस्था उन्हाळी शिबारांचा एक आकर्षक पैकेज घेऊन आल आहे ज्याच्यात साहस व रोमांच यांचा समावेश असेल.

आजच्या स्पर्धात्मक युगात वेळेचा सदुपयोग योग्य रित्या आपल्या विकासासाठी करता येणे खूप आवश्यक झालेले आहे. याच विचाराच्या दिशेने अग्रेसर होत प्रहार संस्थे तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाच्या उन्हाळ्यात सुट्ट्यांचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीने विविध साहसी शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहे.

वय वर्षे ९ ते २५ या वयोगटातील मुला मुली करिता प्रहार शौर्य शिबिरांचे दी. १५ एप्रिल ते दी. २१ एप्रिल, २२ एप्रिल ते दी. २८एप्रिल व दि. २९ एप्रिल ते दि. ५ मे २०१९ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या निवासी शिबिरांमध्ये मुलांना घरच्या सुरक्षित वातावरणातून निघून स्वतःचे दैनंदिन कार्य स्वतः करता यावे] तसेच आपल्या समवयस्क मुलांसोबत एकत्र राहण्याची भावना व मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन चांगल्या गुणांचे सर्वासमक्ष प्रस्तुतीकरण करणे या बिजांचे रोपण करण्यात येते. मुलांना या साहसी निवासी शिबिरामध्ये धावणे, व्यायाम, ओब्स्टेकल ट्रेनिंग, सामूहिक करवाई, व्यक्तिमत्व विकास या विषयाची माहिती देण्यात येईल. हे अभिनव शिबीर उमरेड रोड स्थित प्रहार प्रशिक्षण केंद्रात दिले जाईल.

त्याच प्रमाणे प्रहार सातपुडा त्रेक्किंग कॅम्प दि. २९ एप्रिल ते ५ मे या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या आगळ्या जंगल ट्रेकिंग कॅम्प मध्ये मुलांना ट्रैकिंग, रैपलिंग, रॉक क्लाइम्बिंग, रिवर क्रासिंग, माउंटेनीरिंग जंगल सर्व्हायवल इत्यादी प्रशिक्षणाची माहिती देण्यात येईल. मुलांना या दोन्ही कॅम्प नंतर हिमालयाच्या स्नोव लीने पर्यंत हिमालय भ्रमण कॅम्पचे आयोजन धर्मशाला येथे दि. १५ मे ते २६ मे २०१९ या काळात करण्यात आले असून ट्रेकिंग कॅम्प मध्ये ९ वर्ष पुढील मुले मुली भाग घेऊ शकतात. या कॅम्प मध्ये प्रथम येणार्याला प्रथम प्रवेश या तत्वावर प्रवेश देण्यात येणार आहे. या कॅम्पच्या आवेदानाची अंतिम तारीख ५ एप्रिल २०१९ हि राहील.

प्रहारच्या या सर्वांना उपयोगी फायदेशीर ठरणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याकरिता मुलांना, युवा वर्गाला व पालकांना विनंती करण्यात येते की त्यांनी प्रहार कार्यालय प्रहार मिलिटरी स्कुल, सी.पि. क्लब जवळ, रवि नगर, नागपुर येथे दररोज सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत फोन नं. ०७१२-२५४०६१५, ९८२२५७३४८८, ९५५२६२५३२६, ७३५०७३०५५९ वर संपर्क करावा.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.