महाशिवरात्री निमित्त अभिनव आंदोलन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
मागील तीन दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ४०० कंत्राटी कामगार संपावर आहेत चार महिन्याचे थकित पगार तसेच किमान वेतन या मागणीसाठी हे कामगार संपावर गेलेले आहे शासनाने मात्र अजून पर्यंत कामगारांच्या काम बंद आंदोलनाची दखल घेतलेली नाही जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाने या कामगारांच्या मागण्यांसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अर्थमंत्री, कामगार मंत्री, सचिव स्तरावरील विविध अधिकारी यांची भेट घेऊन सातत्याने कैफियत मांडली जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आंदोलन केले मोर्चे काढले परंतु कामगारांना थकित पगार मिळाला नाही.त्याचप्रमाणे मागील अनेक महिन्यांपासून किमान वेतन लागू करण्यास वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन जाणीवपूर्वक दिरंगाई करीत आहे थकित अपघात व किमान वेतनाच्या मागणीसाठी आज या कामगारांनी जनविकास च्या नेतृत्वात महाशिवरात्री निमित्त भोलेनाथाला साकडे घातले ज्याप्रमाणे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात शासनाने तत्परता दाखवली तशीच तत्परता कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी दाखवावी. सरकारला व अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी या हेतूने आज भोलेनाथाला साकडे घालण्यात आले सायंकाळी ४ वाजता सद्बुद्धी आंदोलन सद्बुद्धी यज्ञ करण्यात आले यावेळी तारा धमके, सिंधू चौधरी, लता उईके, अमर राऊत या कामगारांनी शंकराचे पोहे म्हणून जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला महादेवाने या सरकारला व अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी आम्हाला आमचे थकित पगार व किमान वेतन मिळावे अशी भावना यावेळी कामगारांनी व्यक्त केली या आंदोलनात जनविकास गुरुदास कामडी, दिनेश कंपू, भाग्यश्री मुधोळकर, शेवंता भालेराव, विश्रांती खोब्रागडे, बबीता लोंढे, आरती गाडीवाला, सुमित्रा थोरात, या सद्बुद्धी यज्ञाच्या वेळी महिला कामगारांनी शंकराचे पोहे म्हटले आणि साकडे घातले .