Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

पळसगाव जाट येरगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन



प्रशांत गेडाम/ सिंदेवाही 
सिंदेवाही तालुक्यात जवळ असलेल्या पळसगाव (जाट) गावातील  गट ग्राम पंचायत असलेल्या  येरगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करणयात आले.

यात नागरी सुविधा अंतर्गत येथील स्मशान भूमीला वॉलकंपाऊंड, मुस्लिम कब्रस्तानची सरंक्षण भिंत, दलित वस्ती निधी अंतर्गत २० लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रोड व सोलर पंप पाण्याची टाकी, २५ - १५ मध्ये १० लक्ष रुपयांच्या निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोड चे भूमिपूजन भा.ज.यु.मो तालुका अध्यक्ष तथा पं.स सदस्य रितेश अलमस्त, सरपंचा रसिकाताई कोठेवार, उपसरपंच प्रकाश शेंडे, ग्रा.पं सदस्य वसंत लांजेकार, परवेज शेख, गणपत आत्राम ,मुकरू सुरपाम,सुवर्णताई शेंडे, बालाजी लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवराव कोठेवार, गोसाई हटकर यांच्या सह मोठ्या संख्येने गावातील जेष्ट नागरिक तसेच गावकरी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.