नागपूर/प्रतिनिधी:
जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम महावितरण कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमास नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी संचालक दिलीप घुगल, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, स्वाती प्रसाद रेशमे, अर्चना दिलीप घुगल, महावितरणच्या ग्राहक सल्लागार गौरी चंद्रायण उपस्थित होते.
यावेळी समुपदेशक स्नेहा दामले यांनी " कौटुंबिक मानसिक स्वास्थ " या विषयावर उपस्थित महावितरण महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा नारेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर, प्रज्वला किरनाके, उमा राव, लीना पाटील, मनीषा देशमुख, मनीषा भिवगडे,नेहा हेमने यांनी मेहनत घेतली.