उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग लगतच्या लघुऔद्योगीक वसाहतीतील गिरीराज कापूस जिनींगला विद्युत ठिणगीने आग लागल्यामुळे अनदाजे दोन कोटी रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.कारंजा घाडगे येथील विशाल शिवनारायण अग्रवाल यांचे मालकीची सा जिनींग असून या ठिकाणी कापसापासून तेल,ढेर ल सरकी काम मे तसेच गठाणीचा उद्योग चालतो.
सदर जिनींग मधील मशिन चालू असतांना मजूर काम करीत होते.अचानक शुक्रवारी दुपारी ४ वाजताचे दरम्यान विद्युत ठिणगी कापसाच्या ग॔जी पर्यंत पोहोचली व कापूस पेटवायला सुरूवात झाली.आग लागतच कामावरील मजूर आरडाओरड करीत सैरावैरा धावत सुटले.घटनास्थळावर असलेले शिवनारायण अग्रवाल यांनी आग विझविण्यासाठी पाण्याची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी धाव घेतली असता त्यांचा प्रयत्न असफल ठरला.
त्याचवेळी त्यांना आगीची झळा लागल्या असता ते घटनास्थळावरून पळत सुटले.त्यांना कारंजा येथे दवाखान्यात आणून भरती केले.या घटनेत त्यांना कोणतीही इजा झाली नाही.आगीची घटना घडतात ओरिएंटल टोल च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व पाण्याचे टँकरची व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
परंतु या आगीत घटनास्थळावरील उघड्यावर असलेला जवळपास पंधराशे क्विंटल कापूस व १०० गठाणी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडू अंदाजै दोन कीटीचे नुकसान झाल्याचा अंदाज जळून खाक झाला त्यानंतर आर्वी नगरपरीषदेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळावर पोहोचली.

पोल्ट्रीफीड |