सिंदेवाही तालुका स्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनी संपन्न
सिंदेवाही/प्रतिनिधी : -
पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती सिंदेवाही जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे कडून सिंदेवाही तालुका मध्ये तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचे मौजा पळसगाव (जाट ) येथे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये उपस्थित सिंदेवाही तालुक्यातील समस्त पशुपालक जनतेने सहभाग घेतला होता .
व आपले पशु पळसगाव (जाट) येथे कार्यक्रमांमध्ये आणून उपस्थिती दाखवली . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. मधुकर जी मडावी सभापती पंचायत समिती सिंदेवाही, मा. सौ.मंदाताई बाळ-बुद्धे उपसभापती, मा.रितेश अलमस्त सदस्य पंचायत समिती सिंदेवाही, मा.रणदिंर दुपारे पंचायत समिती सदस्य सिंदेवाही, मा.प्रीती गुरनुले सदस्य पंचायत समिती सिंदेवाही, मा.शीलाताई कन्नाके पंचायत समिती सदस्य गावातील प्रमुख (प्रथम) नागरिक मा. रसिकाताई कोठेवार सरपंच ग्रामपंचायत पळसगाव (जाट ) , प्रकाश शेन्डे उपसरपंच , वसंत पाटील गायकवाड त.मु. गाव समिती अध्यक्ष पळसगाव( जाट), इंल्लुरकर साहेब पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती सिंदेवाही, जिल्हा परिषद चंद्रपुर यांचेकडून तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचे , डॉ. सूरपाम पशुसंवर्धन अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही , संजय कांबळे विस्तार अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही तसेच समस्त अधिकारी-कर्मचारी पशुधन विभाग पंचायत समिती तथा समस्त सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत ग्रामस्थ पळसगाव (जाट) तसेच सिंदेवाही तालुक्यातील जनतेने कार्यक्रमाच्या उपस्थित राहून लाभ घेतला
जिल्हा परिषद चंद्रपुर यांचेकडून सिंदेवाही तालुका मध्ये तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचे मौजा पळसगाव (जाट) येथे आयोजन करण्यात आले होते. यामागील मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण जनतेला पशुपालन विषयी आवड निर्माण व्हावी तसेच या ठिकाणी पशुपक्षी घेऊन जे सहभागी झाले होते .त्यांना प्रत्येकांना प्रोत्साहन पत्र देण्यात आले . व काहींच्या पशूला नंबर देऊन बक्षीस वितरण व रोख रक्कम देण्यात आले .