Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०२, २०१९

वीज ग्राहकांचा ऑनलाईन कडे कल वाढला

सात महिन्यात १६८ कोटी रुपयांचा महसूल
नागपुर/प्रतिनिधी:

    स्मार्ट सिटी कडे वाटचाल करणाऱ्या नागपूर शहारत वीज ग्राहकांनी  महावितरणच्या वीज देयकाची रक्कम भरण्यासाठी ऑनलाईन हा  स्मार्ट पर्याय निवडत  मागील ७ महिन्यात कोट्यवधी रुपयांचा   महसूल जमा केला. 

जुलै-२०१८ ते जानेवारी- २०१९ या कालावधीत नागपूर शहर आणि जिल्ह्यातील ८ लाख ६७ हजार वीज ग्राहकांनी महावितरणच्या तिजोरीत तब्बल १६८ कोटी रुपयांचा महसूल जमा केला. ऑनलाईन पद्धतीने वीज देयकाची भरणा करणाऱ्या वीज ग्राहकांमध्ये काँग्रेस नगर विभाग आघाडीवर असून येथील ४ लाखापेक्षा अधिक वीज ग्राहकांनी या कालावधीत या सेवेचा उपयोग केला आहे.

ग्राहकांना देयकाची रक्कम भरण्यासाठी वीज बिल भरणा केंद्रावर जाण्याची गरज पडू नये यासाठी महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी ऑनलाईन पद्धतीने वीज देयक भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली होती. कधीही. कुठेही. केव्हाही वीज ग्राहक जगाच्या कानाकोपऱ्यातून वीज देयकाची रक्कम भरण्याची सुवीधा महावितरणकडून ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

  महावितरणच्या नागपूर शहर मंडलातील काँग्रेस नगर विभागात या कालावधीत ४ लाख ६ हजार ६०७ वीज ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वीज देयकाचा भरणा केला आहे. काँग्रेस नगर विभागात हुडकेश्वर, रीजंट , शंकरनगर आणि त्रिमूर्ती नगर हे ४ उपविभाग येतात. यातील त्रिमूर्तीनगर उपविभागातील १ लाख ३५ हजार तर हुडकेश्वर उपविभागातील  १ लाख २६ हजार वीज ग्राहकांनी अनुक्रमे २२ कोटी ९३ लाख रुपये आणि २१ कोटी ३६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. रिजंट उपविभागात ६९ हजार वीज ग्राहकांनी २२ कोटी रुपयांचा भरणा केला आहे.

मोठ्या प्रमाणात उच्च दाब वीज ग्राहक असलेल्या बुटीबोरी विभागात या ७ महिन्याच्या कालावधीत १ लाख ९१ हजार वीज ग्राहकांनी तब्बल ३७ कोटी १३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. या विभागातील हिंगणा उपविभागातील १ लाखापेक्षा अधिक वीज ग्राहकांनी १४ कोटी रुपयांचा भरणा केला आहे.

 नागपूर ग्रामीण भागात वीज ग्राहकांमध्ये ऑनलाईन मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक या पद्धतीचा वापर करून देयकाची रक्कम अदा करीत आहेत. या कालावधीत तब्बल २ लाख ६४ हजार वीज ग्राहकांनी याचा वापर केला आहे. काटोल तालुक्यातील महावितरणच्या जलालखेडा उप विभागात जूलै २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत ७,५४७, काटोल ग्रामीण उपविभागात ११,५५८ कोंढाळीत १३७५५, मोहप्यात ५,७७९ नरखेडमध्ये ६०७१ वीज ग्राहकांनी ७ कोटी ६५ लाख रुपयांची वीज देयके ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून भरली. एकट्या कामठी शहरात ३५,०९० वीज ग्राहकांनी ६ कोटी ७४ लाख रुपयांचा भरणा केला. मौद्यात ४४,२८२ वीज ग्राहकांनी ८ कोटी ६१ लाख रुपये, रामटेकमध्ये २९२२७ वीज ग्राहकांनी ६ कोटी १५ लाख रुपये, कळमेश्वरमध्ये ३२,४९७ वीज ग्राहकांनी ४ कोटी ३४ लाख रुपयांचा भरणा केला. सावनेरमध्ये १२,३३३ वीज ग्राहकांनी २ कोटी १४ लाख रुपये, भिवापूरमध्ये १५,४४२ वीज ग्राहकांनी १ कोटी ४७ लाख रुपये भरले. उमरेडमध्ये २१,५७० वीज ग्राहकांनी ३ कोटी ७६ लाखाचा भरणा ऑनलाईन पद्धतीने केला. सुरुवातील केवळ वीज देयकाची रक्कम भरणारे वीज ग्राहक आता स्मार्ट झाल्याने वीज बिलासोबतच नवीन वीज जोडणीसाठी लागणारे शुल्क,  सुरक्षा ठेव , अतिरिक्त सुरक्षा ठेव, वस्तू सेवा कर, करार शुल्क, सोलर रुफटॉप शुल्काचा भरणादेखील ऑनलाईन करीत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.