कामगारांना 4 महिन्यांपासून पगार नाही,किमान वेतनापासूनही वंचित
जन विकास चे पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात आज 2 मार्च रोजी आंदोलनाला सुरूवात
चंद्रपूर- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत. या कामगारांना केवळ सहा हजार रुपये एवढे वेतन मिळते.त्यातही चार महिन्यापासून पगार नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. चार महिन्याचा थकित पगार व किमान वेतनाची मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू राहील अशी माहिती एका पत्रकाद्वारे देशमुख यांनी दिली.
मुलांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतानाही शासनाला मात्र कंत्राटी कामगारांचे पगार देण्यासाठी जाग आलेली नाही. याबाबत जन विकास असंघटित कामगार कर्मचारी संघाने सातत्याने पाठपुरावा केला. मागील सहा फेब्रुवारी 2019 रोजी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्च्या नंतर िल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनामध्ये चार महिन्याचे थकीत पगार देण्याचे व किमान वेतनाच्या नुसार वेतन देण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी 22 फेब्रुवारी पर्यंत तोडगा न निघाल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा लेखी ईशारा जन विकास चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी दिला होता.कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री गिरीश महाजन व कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन कामगारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. मात्र आश्वासनाशिवाय कामगारांना काहीही मिळाले नाही. दिनांक 18 फेब्रुवारी 2019 रोजी या समस्येबाबत देशमुख यांनी जिल्हाधिकारी श्री खेमनार यांची भेट घेऊन चर्चा केली व तातडीने थकित पगाराची समस्या सोडवण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची दखल घेऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीचै दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आयोजन केले होते. या बैठकीत कंत्राटी कामगारांशी संबंधित विविध विभागाचे अधिकारी,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मोरे, जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे पदाधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्रे,उपनिवासी जिल्हाधिकारी भूगावकर, सहाय्यक कामगार आयुक्त श्री लोया उपस्थित होते. मात्र या बैठकीमध्ये थकीत पगारावर कोणताही ठोस कार्यवाही झाली नाही. यामुळे जनविकास ने दिनांक दोन मार्च 2019 पासून बेमुदत काम बंद पुकारले आहे आज दोन मार्चपासून दवाखान्यातील व वैद्यकीय महाविद्यालयातील एकूण सुमारे 400 कंत्राटी कामगार बेमुदत संपावर गेले या कामगारांनी सामान्य रुग्णालयाच्या आवारात धरणे आंदोलनही सुरू केलेले आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व कंत्राटी कामगारांनी याठिकाणी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत धरणे दिले व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे व्यवस्थापन तसेच शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.धरणे आंदोलनात जन विकास चे सतिश खोब्रागडे, कांचन चिंचेकर, विश्रांती खोब्रागडे, शेवंता भालेराव,भाग्यश्री मुधोळकर,सतीश येसांबरे, सतीश घोडमारे,अमोल घोडमारे, राकेश मस्कावार,विवेक मून,रजिया पठाण, विवेक गड्डमवार,सागर हजारे यांच्यासह शेकडो महिला पुरुष कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.