Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०२, २०१९

सी.एन.जी. बसेसमुळे नागपूर प्रदूषणमुक्‍त




  • केंद्रीय रस्‍ते वाहतूक ,महामार्ग  व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
  • नागपूर महानगरपालिकेच्‍या सी.एन.जी. बस सेवेचा गडकरींच्‍या हस्‍ते शुभारंभ



नागपूर दि. 02 मार्च 2019
     डिझेल पेट्रोलवर चालणारे बसेस व वाहने सी.एन.जी. द्वारे संचालित झाल्‍याने नागपूर शहर जल-वायू प्रदूषणापासून मुक्‍त असे हरीत शहर बनेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक ,महामार्ग  व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज केले.स्‍थानिक म.न.पा. इमारतीसमोरील आयोजित   सी.एन.जी. बस सेवेचा शुभारंभ आज त्‍यांच्‍या हस्‍ते झाला, त्‍यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्‍याचे उर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, म.न.पा. आयुक्‍त अभिजित बांगर, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्‍णा खोपडे, परिवहन सभापती बंटी कुकडे   प्रामुख्‍याने उपस्थित होते.

     नागपूर म.न.पा. च्‍या बाजारपेठातून निर्माण होणारी बायोवेस्‍ट तसेच शेतातील तु-हाटी, तणस, उसाची मळी या पासून बायो-सी.एन.जी. ची निर्मिती होते. अशा प्रकारचे प्रकल्‍प भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर सारख्‍या तांदूळ उत्‍पादक जिल्‍हयात निर्माण व्हावे व  तरूण उद्योजकांनीही सी.एन.जी. उत्‍पादनासाठी पुढाकार घ्‍यावा, अशी आशा गडकरींनी यावेळी व्‍यक्‍त केली.

     केंद्रीय परिवहन मंत्रालयातर्फे मुंबई, नवी मुंबई, गुवाहाटी या शहरात मिथेनॉलवर चालणा-या बसेसचा एक पथदर्शी प्रकल्‍प सुरू झाला आहे. गंगा ब्रम्‍हपुत्रामध्‍ये इॅथेनॉलवर संचालित इंजिनाच्‍या साहाय्याने जल वाहतूक होत असून यामूळे वाहतूक खर्चात घट झाली आहे. नागपूर शहरातही 100 टक्‍के इॅथेनॉल वर चालणा-या स्‍कॅनिया बस प्रकल्‍पाची चर्चा देशभरात होत आहे, अशी माहिती त्‍यांनी दिली.

     शेतातील तणस व  शहरातील म्‍युनिसीपल वेस्‍टचे सी.एन.जी.मध्‍ये रूपांतर करण्‍यासाठी ऑटोमोटिव्‍ह रिसर्च  असोसिएशन ऑफ इंडीया (ए.आर.ए.आय.) तर्फे प्रमाणित व  पोलंडद्वारे निर्मित सी.एन.जी. किटस्‌ या बसेसमध्‍ये लागणार असून यामूळे अशा ग्रीन बसचे आयुष्‍य 15 वर्ष राहणार आहे. इंधनाच्‍या बचतीने म.न.पा.ची वर्षाअखेर 75 कोटी एवढी बचतही होणार आहे. नागपूरात आजपासून चालू झालेल्‍या या बससेवेमध्‍ये 50 बसेस सी.एन.जी. वर चालविल्‍या जाणार आहेत. म.न.पा.च्‍या पदाधिकारी व अधिका-यांनी शासकीय वाहनेसुद्धा सी.एन.जी. वर चालवून एक आदर्श प्रस्‍तापित करावा, अशी सूचना त्‍यांनी यावेळी केली.     या कार्यक्रमाप्रसंगी स्‍थानिक लोकप्रतिनिधी म.न.पा.चे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.