Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०२, २०१९

महामार्ग प्राधिकरणामुळे चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत


पाईप लाईन फोडल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम
संजय नगर, कृष्ण नगर, पत्रकार नगर, इंडस्ट्रियल वार्ड, विवेकनगर, सरकार नगरचा पाणीपुरवठा थांबला.. 


चंद्रपूर - एमईएल ते बंगाली कॅम्प येथील रस्ता चौपदरीकरण कामादरम्यान निष्काळजीपणाने खोदकाम केल्याने मागील ८ ते १० दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे मुल रोड ते बंगाली कॅम्प येथील रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु आहे याच भागातून , चंद्रपूर शहर महानगरपालिकेची सावरकर चौक ते बंगाली कॅम्पपर्यंत जुनी AC pressure जलवाहिनी गेली असून याद्वारे शहरातील संजय नगर, कृष्ण नगर, पत्रकार नगर, इंडस्ट्रियल वार्ड, विवेकनगर, सरकार नगर इत्यादी भागात पाणीपुरवठा केला जातो, सोबतच केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवीन एचडीपीई व डी आय जलवाहिनी टाकण्याचे काम जलद गतीने सुरु आहे, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला अवगत करण्यात आले होते. असे असतांनासुद्धा निष्काळजीपणाने खोदकाम करून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे केले जात आहे.

अमृत योजनेची आढावा बैठक दर गुरुवारी महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत घेतली जाते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिका यांची कामे समन्वयाने करण्यास यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचा सहभाग असणे अपेक्षित असते. १३ नोव्हेंबर २०१७ रोजी अमृत योजनेसंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपविभागीय अभियंता व महानगरपालिकेचे अभियंता यांच्याद्वारे संयुक्त पाहणी व जलवाहिनी टाकण्याकरीता जागेची आखणी करण्यात आली होती. सदर पाईप लाईनचे काम पूर्ण झाले असतांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे रस्ता खोदकाम करतांना क्षतिग्रस्त करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यावर पुन्हा २ फेब्रुवारी रोजी २०१९ रोजी संयुक्त पाहणी करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना बैठकीस वारंवार बोलाविले असता असतांना ते अनुपस्थित राहिले. केवळ दिनांक १४ व २८ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीस ए.सी शेख कन्स्ट्रक्शन कंपनी चे प्रतिनिधि व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उप विभागीय अभियंता श्री. ए एम मत्ते उपस्थित होते. रस्त्याचे खोदकाम करतांना जलवाहिनीचे कुठलीही नुकसान होऊ नये याची काळजी घेत पालिकेशी समन्वय राखून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही महानगरपालिकेला कुठलीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी क्षतिग्रस्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिका यांची कामे समन्वयाने करण्याचा महानगरपालिकेद्वारे प्रयत्न होत असतांना सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे निष्काळजीपणाने खोदकाम करून जलवाहिनी पाणीपुरवठा विस्कळीत करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे येथील रस्ता चौपदरीकरणाचे काम अहमदनगर येथील ए.सी शेख कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून त्यांना खोदकामाने पाणीपुरवठा खंडित होण्याच्या सूचना देण्यात येऊन सुद्धा जलवाहिनी वारंवार फोडल्यामुळे गळती निर्माण होऊन ८ ते १० दिवसांपासून संजय नगर, कृष्ण नगर, पत्रकार नगर, इंडस्ट्रियल वार्ड, विवेकनगर, सरकार नगर येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.