नागपूर/प्रतीनीधी:
मार्चला नागपूरच्या जामठा स्टेडियमवर होणार्या भारत-ऑस्ट्रेलिया 1-डे सामन्यासाठी नागपूर येथील विमानतळ,जमठा स्टेडीअम,नागपूर-चंद्रपूर महामार्गान परिसरात नागपूर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त आखला आहे.
भारतात पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ करण्यात आली आहे.
सहआयुक्त कदम यांनी रविवारी सायंकाळी पोलीस जिमखान्यात पत्रकारांना याबाबदची माहिती दिली, यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, विशेष शाखेच्या उपायुक्त निर्मलादेवी आणि परिमंडळ-१चे उपायुक्त विवेक मासाळ उपस्थित होते.
.
छत्रपती चौक ते जामठा स्टेडियमपर्यंत बंदोबस्ताची विभागणी १२ सेक्टरमध्ये करण्यात आली असून त्यासाठी १२०० पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण १५०० पोलीस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक शाखेचे ४२५ पोलीसही सुरक्षा व्यवस्थेत तैनात राहणार असल्याचे सहआयुक्त कदम म्हणाले. स्टेडियमच्या आत-बाहेर आणि सभोवताल पोलिसांचे सुरक्षा कवच राहणार आहे. मैदानाच्या आत-बाहेर पोलिसांव्यतिरिक्त शीघ्र कृती दलाच्या (क्यूआरटी), चार बॉम्ब शोधक व नाशक पथक, (बीडीडीएस) तैनात करण्यात आली आहेत. त्याचसोबतअग्निशमन दल आणि अॅम्बुलन्सही तयार ठेवण्यात येणार आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेता पोलिसांनी सुरक्षेसंबंधाने खबरदारीच्या सर्व उपाययोजना आखल्या आहेत.