Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजावर ६ मार्चपासून बहिष्कार

शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय 
महाविद्यालयात सामावून घेण्याची मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image result for शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर
 चंद्रपूर येथे २०१४ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यांच्या शिक्षण द्रव्य संशोधन विभाग याच्यातील सामंजस्य करारानुसार गेल्या ४ वर्षापासून शासकीय रुग्णालयातील सर्व अधिकारी अधिपरिचारीका व कर्मचाऱ्यांच्या सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्रातील नांदेड, धुळे, यवतमाळ, कोल्हापूर, लातूर आणि अकोला या जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात सामावून घेण्यात आले आहे. या जिल्ह्याप्रमाणेच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय महाविद्यालयातील सामावून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना रास्त मागणी प्रलंबित आहे. .

समायोजनच्या विषयावर राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३ वेळा दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. पंरतु, सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वित्तमंत्र्यांच्या प्रस्तावाला नकारात्मक घेऊन समायोजनाला विरोध दर्शविला आहे. या संबंधाने वरिष्ठास अनेकदा पत्र व्यवहार झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीसंदर्भात शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असून सर्व अधिपरिचारीका, टेक्निशियन व कर्मचाऱ्यांनी १५ फेब्रुवारीला सामूहिक रजा आंदोलन केले तर ६ मार्चपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजावर सर्व कर्मचारी बहिष्कार टाकणार आहे. आंदोलनातून होणाऱ्या गैरसोयीबाबत आरोग्य प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.