Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २४, २०१९

25 मार्चला हंसराज अहीर करणार उमेदवारी अर्ज दाखल

चंद्रपूर/प्रतीनिधी:
Image result for हंसराज अहीर
13 चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा- शिवसेना - रिपाई (आठवले) युतीचे लोकप्रिय उमेदवार विद्यमान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर , सोमवार दि. 25 मार्च 2019 रोजी दु. 11ला आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणुक अधिका-यांकडे सादर करणार आहेत. 

स्थानिक पटेल हायस्कुल समोरील छत्रपती शिवाजी महाराज चैकातून भाजपा, शिवसेना व रिपाई (आ.) पक्षाच्या हजारो पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत एका भव्य रॅलीव्दारे युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांना वाजतगाजत ढोल ताशांच्या निनादात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात येईल व त्यानंतर युती पक्षाचे प्रमुख पदाधिकरी यांचेसह जिल्हा निवडणुक अधिका-यांकडे ते आपले नामांकन अर्ज दाखल करतील. 

या रॅलीमध्ये राज्याचे अर्थ , नियोजन व वनेमंत्री, ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार,, उर्जा राज्यमंत्री ना. मदन येरावार, महसुल राज्यमंत्री संजय राठोड, राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नानाभाऊ शामकुळे, आ. संजय धोटे, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार , आ. राजू तोडसाम आ. रामदास आंबटकर, आ.अॅड. निलय नाईक, आ. अनिल सोले, चंद्रपूर जि.प अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, अण्णासाहेब पारवेकर , उध्दवराव येरमे, माजी मंत्री संजय देवतळे, हरिश शर्मा, महापौर अंजली घोटेकर, शिवसेना नेते दिलीप कपूर, वणीचे माजी आमदार विश्वास नांदेकर, रमेश देशमुख, जिल्हा प्रमुख संदीप गि-हे , सतीश भिवगडे, नितीन मत्ते सुरेश पचारे , राजेश नायडू मनोज पाल, जयदिप रोडे रिपाई (आ.) नेते अशोक घोटेकर जयप्रकाश कांबळे , राजु भगत , युती पक्षांचे सर्व पदाधिकारी , नगरसेवक , भाजयुमो, महिला आघाडी, भाजपाचे सर्व आघाड्यांचे पदाधिकारी तसेच युतीपक्षाच्या विविध आघाड्याांचे पदाधिकारी कार्यकर्ते व जि.प., पं.स. सभापती, जि.प., पं.स. सदस्य, न.प. अध्यक्ष व नगरसेवक, पक्षावर निष्ठा ठेवणारे समर्थक नागरिक उपस्थित राहणार असून या रॅलीमध्ये नागरिकांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजप- शिवसेना - रिपाई (आ.) युतीच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून करण्यात आले आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.