शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरण अंगावर
नेहमी विविध करणाने चर्चेत असलेले चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोमवारी पुन्हा चर्चेत आले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थी मारहाण प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील इन्स्टुमेंशन अंतिम वर्षाचा विद्यार्थी गणेशकेशव मगर सोमवारी सकाळी महाविद्यालयात ग्रंथालयाकडे जात असताना स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. पेचे यांनी गणेश मगर याला अडवून शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी चंद्रपुरातशैश्निक वातावरण गढूळ झाले आहे. या घटनेनंतर महाविद्यालयातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एकत्र येत येत घटनेचा निषेध नोंदविला. विद्यार्थी एकत्र आल्याने महाविद्यालयात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
प्रा. पेचे हे नेहमीच महाविद्यालयात दादागिरी करीत असल्याचा आरोप संतप्त विद्यार्थ्यांनी केला असून, प्रा. पेचेवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनातून प्राचार्यांकडे केली आहे. दरम्यान, गणेश मगर या विद्यार्थ्याने रामनगर पोलीस ठाणे गाठून प्रा.पेचेविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली. या तक्रारीवरून प्रा. पेचेविरुद्ध भादंवि कलम ३२३, ५०४ अन्वयेअदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



