Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २२, २०१९

चंद्रपूर:प्रशासकीय इमारत परिसरातील सर्व दुकाने हटवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image result for खबरबात
 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणुकीकरिता दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सदर निवडणुकीकरिता दिनांक 22 मार्च ते 25 मार्च 2019 या कालावधीत मतदान यंत्राची प्रथम सरमिसळ करण्यात येणार आहे. मतदान यंत्रे प्रशासकीय इमारतीमध्ये ठेवण्यात आलेली असून दिनांक 22 मार्चला मतदान यंत्रांचे सरमिसळ केल्यानंतर सहा विधानसभा मतदारसंघांचा मतदान यंत्र वितरीत करण्यात येणार आहे.

सहा विधानसभा मतदारसंघाचे ट्रक व इतर वाहने प्रशासकीय इमारतीच्या आवारात गोळा होणार आहेत. निवडणुकीच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी सहा उपविभागीय कार्यालयातील ट्रक व इतर वाहने यांचे योग्यरीत्या आवागमन सुरळीत रित्या व्हावे, तसेच मतदान यंत्राचे वाटप करताना भारत निवडणूक आयोगाची निर्देशाप्रमाणे आवश्यक प्रमाणात सुरक्षा व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

त्यासाठी प्रशासकीय इमारत परिसरातील सर्व चहा कॅन्टीन, दुकाने इत्यादी दिनांक 21 मार्च ते 25 मार्च 2019 या कालावधीत हटविण्यात यावी. प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी ओळखपत्र सतत आपल्यासोबत बाळगण्यात यावे. याशिवाय कार्यालयीन परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच उक्त कालावधीत प्रशासकीय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वारातून कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचे खाजगी किंवा वैयक्तिक व शासकीय वाहनास प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी निवडणूक यंत्रणेला दिले आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.