Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च १७, २०१९

डिफेन्स मधील शस्त्राचे प्रदर्शन पाहून भारावले नागरीक

आयुध निर्माण अंबाझरी मध्ये प्रदर्शनीचे थाटात उदघाटन
सैनिकांना लागणाऱ्या शास्त्राची भव्य प्रदर्शनी 
वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:

डिफेन्स येथील समाज सदन सभागृह मध्ये आयुध निर्माणी दिवस निमीत्य आयुध निर्माणी अंबाझरी तर्फे सैनिकांला लागणाऱ्या शस्त्राची भव्य प्रदर्शनी रविवार १७ मार्च रोजी भरविण्यात आली . संपूर्ण देशात १८ मार्च हा आयुध निर्माणी दिवस साजरा केला जातो .

देशात पहिली आयुध निर्माण कंपनी बंदूक व सेल फॅक्टरी काशीपूर मध्ये स्थापन करण्यात आली . याच आधारावर अंबाझरी आयुध निर्माणी कंपनीमध्ये स्थापना दिवसाचे औचित्य साधत स्थापना दिवस साजरा करण्यात आला . रविवार १७ मार्च रोजी सकाळी सहा वाजता महाप्रबंधक सी . एल .मौर्य यांनी झेंडी दाखवून डॉ .आंबेडकर चौकापासुन कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली .यामध्ये कंपनीचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले यामध्ये संघटन, वचनबद्ध राहण्याचा शपथविधी पार पडला .

 प्रदर्शनीचे उदघाटन दुपारी २ .३० वाजता महिला कल्याण समिती अध्यक्ष वंदना मोरया यांच्या हस्ते करण्यात आले . प्रदर्शनीमध्ये आयुध निर्माणीमध्ये बनणारे उत्पादन व शस्त्राला लागणारे उपकरण , हार्डवेअर वस्तू, मेकॅनिकल, फ्युज सेल, ॲल्युनियम, कास्टिंग ,पीनाका ,रॉकेट ,अशा विविध वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहे .कंपनी परिसरातील आजूबाजूच्या गावातील नागरीक प्रदर्शनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे . प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी आयु डिझाईन सेंटर च्या अंतर्गत सेंटर फॉर डिझाईन अँड डेव्हलपमेंट तसेच कंपनीचे सर्व अधिकारी यांनी सहकार्य केले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.