Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च १७, २०१९

जय श्री श्यामजीच्या जयघोषाने निघाली श्री श्याम धाम पद यात्रा

वाडी(नागपूर)/अरूण कराळे:

येथील गजानन सोसायटीमधील क्रिडा मैदानावरुन रविवार १७ मार्च रोजी पहाटे ५ वाजता श्री श्याम धाम पद यात्रा निघून नंदनवन येथे पोहचली . जय श्री श्याम की जय, हारे के सहारे की जय, शीश के दाने की जय होच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला .ज्याप्रमाणे राजस्थानातील शिखर येथे त्या परिसरातील भक्त असाहय भक्तांना मदत करुन योगदान देतात म्हणून या श्यामजींना हारे का सहारा असेही म्हणतात .त्याच प्रमाणे वाडीतील श्री श्याम मित्र मंडळ राजस्थान येथे दरवर्षी जाऊ शकत नसल्यामुळे नंदनवन , नागपूर येथे खाटू धाम पर्यत पद यात्रा काढून असाहय लोकांना सहारा देऊन श्रीकृष्णरूपी खाटू श्यामजीची आराधना करुन महाउत्सव साजरा केला . यावेळी श्री श्याम मित्र मंडळाचे भक्त पदयात्रेत सामील होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.