स्वच्छ सर्वेक्षण २०१९ निकाल जाहीर - चंद्रपूर शहर महानगरपालिका विदर्भात पहिल्या क्रमांकावर, ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ( मध्यम शहर) नागरिकांच्या प्रतिकिया ( सिटीझन फीडबॅक ) या घटकात देशातून प्रथम क्रमांक, मा. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान.
चंद्रपूर/प्रतीनिधी:
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या स्वच्छता परीक्षेत चंद्रपूर शहर महानगरपालिका विदर्भातून प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाली असून महाराष्ट्रातून ३ ऱ्या तर देशातून २९ व्याक्रमांकावर आली आहे. विशेष म्हणजे ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ( मध्यम शहर) नागरिकांच्या प्रतिकिया ( सिटीझन फीडबॅक ) या घटकात चंद्रपूर शहराने देशातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दि. ०६ मार्च २०१९ रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यातयाबाबत घोषणा करण्यात आली. या सोहळ्यात मा. महापौर सौ. अंजलीताई घोटेकर व आयुक्त श्री. संजय काकडे यांना दिल्ली येथे मा. राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्तेपुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर श्री. अनिल फुलझेले हे सुद्धा उपस्थित होते .
शहरांतील सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी नगर विकास मंत्रालयाने २०१४ मंधे स्वच्छ सर्वेक्षणाची सुरवात केली होती.. देशपातळीवरील हे सर्वेक्षण नावीन्यपूर्णपद्धतीने व विहित कालमर्यादेत पार पाडण्यात आले आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि लहान तसेच मोठी शहरे यांना अधिकराहाण्यायोग्य बनविण्याच्या दिशेने सर्वानी एकत्रित काम करणे याविषयी समाजाच्या सर्व घटकांमध्ये जनजागृती करणे हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट होते. शहरे अधिक स्वच्छ करणेतसेच नागरी संस्थांतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांच्या दर्जामध्ये सुधारणा करून शहरांमध्ये निकोप स्पर्धेला उत्तेजन हा ही या स्पर्धेचा उददेश होता.
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मधे चंद्रपूर शहरातील नागरिकांनी ज्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व आपल्या शहराला स्वच्छतेत चांगल्या क्रमांकावर आणले त्याबद्दल नागरिकांचे आभार व अभिनंदन करते.आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या नेतृत्वात महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी जे परिश्रम केले,स्वछता जनजागृती करण्यात सर्व नगरसेवकांनी जी मोलाची मदत केली त्याचे हे फलित आहे. जनतेच्या सहकार्याने आज आपण हा पुरस्कार घेत आहोत. यापुढेहीचंद्रपूरातील नागरिकांचे सहकार्य लाभत राहील याची आम्हाला खात्री आहे.
महापौर सौ. अंजली घोटेकर -
मागील वर्षी स्वच्छतेत मागे पडलेल्या आपल्या चंद्रपूर शहराने या वर्षी देशातून २९ वा क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वर्षीही आपणस्वच्छता राखण्यात कुठेच कमी नव्हतो मात्र नागरिकांच्या प्रतिक्रिया ( सिटीझन फीडबॅक ) या घटकात आपण मागे पडलो होतो. मात्र या वर्षी नागरिकांनी महानगरपालिकेचेप्रयत्न जाणून व स्वच्छता ही आपली जबाबदारी समजून स्वच्छता प्रश्नांना उत्तरे दिली व शहराला विदर्भातुन प्रथम क्रमांकावर आणण्यास मदत केली आहे. याबद्दल मीचंद्र्पुर शहरातील नागरिकांचे, पदाधिकाऱ्यांचे व महानगरपालिका अधिकारी - कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो.
-आयुक्त श्री. संजय काकडे