Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०६, २०१९

बोखा-यात होणार 1 कोटी 29 लाखांचे रस्ते


अनिकेत मेश्राम/कोराडी 


हिंगणा विधानसभा सर्कल अंतर्गत भोकारा ग्रा पं येथे मा. आमदार श्री समीरभाऊ मेघे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित , तसेच नागपुर जिल्ह्याचे ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली DPDC व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत एकुण 1 कोटी 29 लाख रुपये खर्चाच्या विविध रस्त्याच्या भुमिपुजनाचा कार्यक्रम आज पार पडला.

भुमिपुजन कार्यक्रमात भोखारा ग्रा पं च्या उपसरपंच सौ. वर्षा सहारे, ग्रा पं सदस्य ईशान कुर्वे, डाँ सुमेध धोंगडे, सौ सुप्रिया आवळे, गोपाल चव्हाण तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वासभाऊ आवळे, दिपकभाऊ आवळे, सुनील साळवे, प्रदीपभाऊ मंडपे, मुन्ना चव्हाण आदी उपस्थित होते.

कोराडी काँलनी ते भोखारा या अतिमहत्त्वाच्या रोडचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे भुमिपुजन होऊन ते कामाला सुरुवात झाल्यामुळे संपूर्ण गावकरी यांनी ऊर्जामंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्री समीरभाऊ मेघे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री पन्नालालजी रंगारी,विश्वासभाऊ आवळे व पवन आवळे यांचे आभार व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.