Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०६, २०१९

T-४९ वाघिणीच्या तीन बछड्यांना रेडिओकॉलर आयडी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
The radiocolar ID of the T-49 three female calves | टी-४९ वाघिणीच्या तीन मादी बछड्यांना रेडिओकॉलर आयडी
ब्रह्मपुरी वनविभागात वाढत्या वाघांच्या हल्ल्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘पूर्व विदर्भातील व्याघ्र प्रदेशात वाघांच्यास्थालांतरणाचा अभ्यास’ या संशोधन प्रकल्पांतर्गत ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिसरात वास्तव्यास असलेल्या टी-४९ च्या तीन मादी बछड्यांना ‘रेडियो कॉलरआयडी’ लावण्यात आले आहे.

ब्रह्मपुरी वनविभागातील ३ छाव्यांना रेडिओ कॉलरआयडी करण्यात आल्यामुळे ब्रह्मपुरी वनविभागातील वाघांच्या हालचालीवर सनियंत्रण करण्यास मोठी मदत होणार आहे. या मोहिमेमुळे सदर परिसरात घटना घडल्यास त्या घटनेबाबत ठोस पुरावे मिळविण्यासाठी भविष्यात त्याचा उपयोग होईल.

सदर मोहिमेत भारतीय वन्यजीव संस्था देहरादूनचे पशुचिकित्सक डॉ. पराग निगम, डॉ. बिलाल हबीब तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी चेतन पातोड यांच्या चमुने बेशुद्ध करून रेडिओ कॉलरआयडी लावली.
यावेळी  ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह, ब्रह्मपुरी वनविभाग प्रादे. व वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक रामेश्वर बोंगाळे, दक्षिण ब्रह्मपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर, उत्तर ब्रह्मपुरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी ब्राह्मणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, तसेच क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांचा समावेश होता.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.