जुन्नर /आनंद कांबळे
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वतीने शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध शाहीर, रायगड भूषण वैभव घरत यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत कार्यक्रमाला दाद दिली. असा कार्यक्रम पंचायत समिती जुन्नरचे वतीने प्रथमच आयोजित केल्याबद्दल उपस्थितांनी गट विकास अधिकारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
यावेळी वैभव घरत यांनी छत्रपती शिवरायांचे बालपण, स्वराज्य निर्मितीची संकल्पना, छत्रपती संभाजी राजे यांचे स्वराज्य सरंक्षण कार्य, विविध पराक्रम व लढाईचे वर्णन, गड संवर्धन, पर्यावरण रक्षण, लेक वाचवा लेक शिकवा, स्त्री भ्रूण हत्या या विषयांवर पोवाडे सादर केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य शाम माळी, गट विकास अधिकारी विकास दांगट, सहायक गट विकास अधिकारी हेमंत गरिबे, पशुधन विकास अधिकारी डॉ अविनाश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमेश गोडे, गट शिक्षणाधिकारी पी एस मेमाणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी एच एम हाके यांसह जुन्नर शहरातील हायस्कूल मधील विद्यार्थी, महाविद्यालयाचे विद्यार्थी व आशा वर्कर्स, पंचायत समितीचे कर्मचारी व जुन्नर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गट विकास अधिकारी विकास दांगट यांच्या हस्ते चांदीची तलवार देऊन घरत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन गट शिक्षणाधिकारी पी.एस.मेमाणे, कक्ष अधिकारी रामचंद्र तळपे, विस्तार अधिकारी के बी खोडदे, सहाय्यक लेखाधिकारी बी डी गाडेकर, सतिश शिंदे, संतोष भुजबळ, नितीन शेंडे, मुकुंद नांगरे यांनी केले.